Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शाळांबाबत मोठा खुलासा! गोव्यात विद्यार्थ्यांची गळती वाढली; शिक्षण मंत्रालयाच्‍या अहवालातून माहिती उघड

Goa student dropout rate: २०२३–२४ मध्‍ये प्राथमिक ते उच्च माध्‍यमिकपर्यंत खुल्‍या गटातील ७८, एससीतील १.९, एसटीतील ८.६, ओबीसीतील ११.४ आणि मुस्‍लिम प्रवर्गातील १२.७ टक्‍के विद्यार्थी होते.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्‍ये विद्यार्थ्यांसाठी आवश्‍‍यक साधनसुविधांमध्‍ये सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ करण्‍यात येत असल्‍याचे वारंवार सिद्ध झालेले असतानाही प्राथमिक आणि माध्‍यमिक पातळीवरील विद्यार्थ्यांच्‍या गळतीत मात्र वाढ झाल्‍याचे शिक्षण मंत्रालयाने नुकत्‍याच जारी केलेल्‍या ‘युडीआयएसई प्‍लस’ या अहवालातून समोर आले आहे.

२०२३–२४ च्‍या तुलनेत २०२४–२५ मध्‍ये प्राथमिक ते उच्च माध्‍यमिकपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्‍या संख्‍येत घट, खुल्‍या आणि मुस्‍लिम प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्‍या संख्‍येत वाढ, तर अनुसूचित जातीतील (एससी) विद्यार्थी संख्‍या स्‍थिर असल्‍याचेही अहवाल सांगतो.

२०२३–२४ मध्‍ये प्राथमिक ते उच्च माध्‍यमिकपर्यंत खुल्‍या गटातील ७८, एससीतील १.९, एसटीतील ८.६, ओबीसीतील ११.४ आणि मुस्‍लिम प्रवर्गातील १२.७ टक्‍के विद्यार्थी होते. २०२४–२५ मध्‍ये खुल्‍या गटातील विद्यार्थ्यांची टक्‍केवारी वाढून ती ७८.५ इतकी झाली, एससी गटातील स्‍थिर राहिली, तर एसटीची ८.४ आणि ओबीसीची ११.२ टक्‍क्‍यांवर आल्‍याचेही आकडेवारीतून दिसून येते.

२०२३–२४ मध्‍ये प्राथमिक पातळीवरील विद्यार्थ्यांच्‍या गळतीचे प्रमाण ०.८, उच्च प्राथमिक पातळीवरील प्रमाण १.१, तर माध्‍यमिक पातळीवरील गळतीचे प्रमाण ८.०७ टक्‍के इतके होते. २०२४–२५ मध्‍ये उच्च माध्‍यमिक पातळीवरील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होऊन ते ०.८० टक्‍के इतके झाले, परंतु प्राथमिक पातळीवरील प्रमाण वाढून ते ०.३० आणि माध्‍यमिक पातळीवरील प्रमाण ८.०७ वरून ९.३० टक्‍क्‍यांवर पोहोचल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दरम्‍यान, राज्‍यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार रोजगारासाठी ये–जा करीत असतात. त्‍यांची मुले राज्‍यात शिक्षण घेत असतात, परंतु कालांतराने रोजगाराच्‍या निमित्ताने हे कामगार स्‍वत:च्‍या किंवा इतर राज्‍यांमध्‍ये स्‍थलांतर करत असतात. विद्यार्थी गळतीस हेच प्रमुख कारण असल्‍याचे शिक्षण खात्‍याने यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे.

विद्यार्थी घटले, शिक्षक वाढले...

१ २०२३–२४ च्‍या तुलनेत २०२४–२५ मध्‍ये प्राथमिक ते उच्च माध्‍यमिकपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या संख्‍येत ४,१८९ ने घट झाली, तर तेथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्‍या संख्‍येत मात्र ६०२ ने वाढ झाल्‍याचे अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

२ २०२३–२४ मध्‍ये प्राथमिक ते उच्च माध्‍यमिकपर्यंत ३,०४,७३५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. २०२४–२५ मध्‍ये त्‍यात ४,१८९ ने घट होऊन ही संख्‍या ३,००,५४६ इतकी झाली, तर २०२३–२४ मध्‍ये या शाळांमध्‍ये १४,५९४ शिक्षक कार्यरत होते. २०२४–२५ मध्‍ये त्‍यात ६०२ ने वाढ होऊन हा आकडा १५,१९६ झाल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाण्याचा ग्लासच नाही बसलेली खुर्ची- टेबलही पुसलं, पुतिन भेटीनंतर 'पुरावे नष्ट'; किम जोंगना वाटतेय DNA चोरीची भीती?

Thimmappiah Cricket: गोव्याचा मोसमपूर्व स्पर्धात्मक ‘सराव’ सुरु! विदर्भ, महाराष्ट्राशी भिडणार

Goa Shivsena: मराठी राजभाषा होऊ शकली नाही आणि 'मगो'ला पर्याय म्हणून शिवसेना गोव्यात आली; पुनरागमन किती प्रभावी?

जेठालालच्या 'त्या' पत्नीला धक्का! तारक मेहता फेम अभिनेत्रीचा 'घटस्फोट'; 13 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय

सायंकाळपर्यंत टाळा उघडा! हायकोर्टाच्या जुन्या इमारतीला टाळा ठोकल्याप्रकरणी, 'हा खूप गंभीर प्रकार आहे', म्हणत कोर्टाने गोवा सरकारला झापलं

SCROLL FOR NEXT