GEC news Goa
GEC news GoaDainik Gomantak

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

GEC Professors Reinstated: महिनाभरापासून अनिश्चिततेच्या गर्तेत असलेल्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील (GEC) ३५ कंत्राटी प्राध्यापकांना अखेर न्याय मिळाला
Published on

पणजी: गेल्या महिनाभरापासून अनिश्चिततेच्या गर्तेत असलेल्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील (GEC) ३५ कंत्राटी प्राध्यापकांना अखेर न्याय मिळाला आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या हिताचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभेत जोरदारपणे मांडल्यानंतर, सरकारने तातडीने कार्यवाही केली. या प्रयत्नांमुळे, महाविद्यालयाचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार

गेले अनेक दिवस GEC च्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांविना राहावे लागत होते. याचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता. दुसरीकडे, महाविद्यालयात कार्यरत असलेले ३५ अत्यंत पात्र कंत्राटी प्राध्यापक आपल्या नोकरीच्या भवितव्याबद्दल चिंतेत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी तीन वेळा चर्चा करून आणि पगारवाढीची तसेच कराराचे नूतनीकरण करण्याची आश्वासने मिळूनही कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता.

विधानसभेत विषय मांडताच सरकारला जाग

अखेर ६ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय विधानसभेत मांडला. विद्यार्थ्यांचे नुकसान आणि प्राध्यापकांची दयनीय अवस्था यावर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. सरदेसाईंच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला याची गंभीर दखल घेणे भाग पडले.

याचा परिणाम म्हणून, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व ३५ प्राध्यापकांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे फोन आले. १३ ऑगस्ट २०२५ पासून त्यांनी पुन्हा महाविद्यालयात शिकवायला सुरुवात केली असून, सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

GEC news Goa
Goa News : गोवा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे नूतनीकरण करणार | Gomantak Tv

शिक्षणाचा आणि गोव्याचा विजय!

विजय सरदेसाई आणि सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन केलेल्या संघर्षामुळे हे यश मिळाले आहे. हा केवळ प्राध्यापकांचा विजय नाही, तर गोव्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मिळवलेला एक महत्त्वाचा विजय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com