Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

Goa School Retention Rate: संपूर्ण देशात केवळ चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा रिटेन्शन रेट १०० टक्के असल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये फाउंडेशन स्तरावर प्रवेश घेतलेले सुमारे २८ टक्के विद्यार्थी बारावीपर्यंत पोहोचत नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या २०२५–२६ मधील ‘युडीआयएसई प्लस’ अहवालातून समोर आले आहे.

अहवालानुसार, २०२५–२६ मध्ये गोव्याचा शालेय प्रवेशापासून ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत टिकून राहण्याचा दर (रिटेन्शन रेट) ७१.७ टक्के इतका होता. यातून ७१.७ टक्के विद्यार्थी शालेय प्रवेशापासून ते उच्च माध्यमिकपर्यंत टिकून राहतात, तर सुमारे २८ टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे दिसून येते. शालेय प्रवेशापासून उच्च माध्यमिकपर्यंत ६५.५ टक्के मुले आणि ७८.४ टक्के मुली टिकून राहतात, असे अहवालात म्हटले आहे.

यातून बारावीपर्यंत पोहोचण्याआधीच शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शालेय प्रवेशापासून उच्च माध्यमिकपर्यंत टिकून राहण्याचा राष्ट्रीय दर ५१.९ टक्के इतका आहे. त्या तुलनेत गोव्याचा ७१.७ टक्के दर समाधानकारक असल्याचेही अहवालातून दिसून येते.

१०० टक्के दर असलेला चंदीगड एकमेव

संपूर्ण देशात केवळ चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा रिटेन्शन रेट १०० टक्के असल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. त्यानंतर या यादीत केरळ (९०.१ टक्के), लक्षद्वीप (८५.५ टक्के), पुदुच्चेरी (८२ टक्के), दिल्ली (८०.४ टक्के), हरियाणा (७८.३ टक्के) आणि आंध्र प्रदेश (७८.१ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT