Goa Laptop Scheme: गोव्यातील SC, ST विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप! कुठे भराल अर्ज? काय आहेत निकष? वाचा..

SC ST laptop scheme: उल्लेखनीय कामगिरी करत उत्तीर्ण झालेल्या एससी, एसटी समाजातील प्रत्येक तालुक्यातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना (५ मुली आणि ५ मुलगे) मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहेत.
Goa laptop scheme eligibility
Goa laptop scheme studentsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यावे, त्यांनी चांगली कामगिरी करावी या उद्देशाने गोवा सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे एससी आणि एसटी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दहावीत उल्लेखनीय कामगिरी करत उत्तीर्ण झालेल्या एससी, एसटी समाजातील प्रत्येक तालुक्यातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना (५ मुली आणि ५ मुलगे) मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज www.infotech.goa gov.in या पोर्टलच्या माध्यमातून भरावेत. लवकरच हे पोर्टल अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे गोवा शिक्षण मंडळाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Goa laptop scheme eligibility
New Education Policy: सर्व शिक्षकांना 2030 पर्यंत प्रशिक्षित करणार, शिक्षण सचिवांनी दिली माहिती; अद्ययावत राहण्याचे केले आवाहन

या योजनेत पात्र ठरणारा उमेदवार गोव्यात जन्मलेला असावा. तो एससी, एसटी समाजातील असावा. दहावीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा तसेच दहावीच्या परीक्षेत किमान ७० टक्के गुण असावेत. तो उमेदवार एससी, एसटी समाजात तालुक्यात सर्वाधिक गुण घेत पहिल्या पाचमध्ये असावा व इतरही अटी आहेत.

Goa laptop scheme eligibility
Goa Education: गोंयकारांच्या 'शिक्षणाचे' कंत्राट नफेखोर कोचिंग सेंटर्सकडे जाईल का?

काहीवेळा अटीत शिथिलता किंवा बदल करण्याचे अधिकारही माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे आहेत. या योजनेमुळे एससी, एसटी समाजातील मुलांना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची संधी देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com