Skills Education Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : पडोसे विद्यालयात आनंदमयी शिक्षण; मुलांच्‍या कौशल्यावर भर

अनोखे उपक्रम : भित्तीपत्रकांवर विविध माहिती नमूद करून ती मुलांना शिकविली जाते

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : सध्‍याच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात शिक्षणाला अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. पण हे शिक्षण घेताना मुलांना कोणत्‍याही अडचणी येऊ नयेत व हसत खेळत आनंदी वातावरण असणे तेवढेच गरजेचे असते. ही किमया साधली आहे ती ही सत्तरी तालुक्यातील पडोसे सरकारी प्राथमिक विद्यालयाने.

या शाळेत जमिनीवर लहान गुळगुळीत दगडांच्या सहाय्याने मुलांना अक्षर ओळख करून दिली जाते. तसेच भित्तीपत्रकांवर विविध माहिती नमूद करून ती मुलांना शिकविली जाते. या शाळेच्या शिक्षकांनी राबविलेला हा कौशल्यात्मक उपक्रम प्राथमिक मुलांच्या जडणघडणीत, सर्वांगीण विकासात भर घालणारा ठरणार आहे.

शिक्षण हे परिवर्तनशील असावं. आजचा विद्यार्थी हा चोखंदळ असून त्याला नवनवीन गोष्टी शिकण्यात रस आहे. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा पुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान देणं ही आजच्या शिक्षण पद्धतीची खरी गरज आहे. पण त्याहीपेक्षा मुलांमधील सुप्त गुण आणि कौशल्य विकसित केले पाहिजे. असाच हा नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम पडोसे सरकारी प्राथमिक विद्यालयाने राबविला आहे.

कृतिशील मार्गदर्शनामुळे विषय सोपा

मूल शाळेत येण्यापूर्वी अनेक गोष्टी शिकून शाळेत प्रवेश करते. मुलांना गरज असते ती पुढील मार्गदर्शनाची. आणि हे मार्गदर्शन जर कृतीशील असेल तर मुलांना कोणत्याही कठीण विषयाचे ज्ञान अगदी सहज आणि सोपे होऊन जाते. तसेच ते चिरकाल स्मरणात राहते. नवीन शिक्षण प्रणालीनुसार मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षणाची आवड लागली पाहिजे, असे शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर ऊर्फ ओंकार वझे यांनी सांगितले. दरम्‍यान, याकामी शाळेचा अन्य शिक्षकवर्गही अतिशय मेहनत घेत आहे.

आम्‍ही आमच्या शाळेत मुलांना अनेक उपक्रम पाठ्यपुस्तकाबाहेरचे शिकवितो. बडबडगीत, गोष्टी, गमतीजमती, भाषिक-गणिती खेळ, इंग्रजी व्याकरण इत्यादी विषय कृती आणि शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने शिकविले जातात. त्‍यामुळे मुले आनंदाने शिकतात. त्‍यांचे भाषिक कौशल्य श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन आपोआपच विकसित झाले आहे.

- प्रभाकर ऊर्फ ओंकार वझे, मुख्याध्यापक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT