Goa school dropout report Dainik Gomantak
गोवा

Goa Education: पाच वर्षांत 891 मुलांनी सोडल्या शाळा! 374 किशोरवयीन मुलींचा समावेश; राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

Goa school dropout report: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील ८९१ मुलांनी शाळा सोडल्‍या, ज्‍यात ३७४ किशोरवयीन मुलींचा समावेश.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील ८९१ मुलांनी शाळा सोडल्‍या, ज्‍यात ३७४ किशोरवयीन मुलींचा समावेश असल्‍याचे केंद्रीय महिला आणि बाल कल्‍याण राज्‍यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्‍यसभेत दिलेल्‍या लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून उघड झालेले आहे.

स्थलांतर, बिकट आर्थिक परिस्थिती, बाल वयात येणाऱ्या घरगुती जबाबदाऱ्या आदी कारणे या गळतीस कारणीभूत असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्‍यासाठी तसेच आर्थिक स्‍थिती बिकट असलेल्‍या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्‍साहन देण्‍यासाठी केंद्र सरकारने गोव्‍यासह सर्वच राज्‍यांमध्‍ये समग्र शिक्षा अभियान सुरू केले आहे.

या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, वाहतूक भत्ता पुरवण्‍यात येत आहे. शिवाय त्‍यांच्‍यासाठी हंगामी वस्‍तीगृहेही उभारण्‍यात येत आहे, असेही मंत्री ठाकूर यांनी उत्तरात नमूद केले आहे.

शाळा सोडलेली मुले

वर्ष एकूण किशोरवयीन मुली

२०२१–२२ ९८ ३५

२०२२–२३ २५३ १२०

२०२३–२४ १९६ ८८

२०२४–२५ १४८ ५९

२०२५–२६ १९६ ७२

एकूण ८९१ ३७४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT