Goa Politics: ‘गोंयकारपण’ सांभाळण्यासाठी फॉरवर्ड कटिबद्ध! सरदेसाईंचे आश्वासन; मयेवासीयांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास भाजपला अपयश आल्याचा दावा

Vijai Sardesai: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील गोवा फॉरवर्डच्या उमेदवार प्रा. राधिका राजेश कळंगुटकर यांच्या प्रचारकार्यासाठी मये येथे आले असता सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: स्थलांतरित मालमत्तेच्या विळख्यात मयेवासीय कित्‍येक वर्षे अडकून पडले आहेत. त्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे असमर्थ ठरले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी केला. ‘गोंय आणि गोंयकारपण’ सांभाळून ठेवण्यासाठी गोवा फॉरवर्ड कटिबद्ध आहे, असेही ते म्‍हणाले.

मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील गोवा फॉरवर्डच्या उमेदवार प्रा. राधिका राजेश कळंगुटकर यांच्या प्रचारकार्यासाठी मये येथे आले असता सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. ते म्‍हणाले, एका बाजूने सरकारने ‘माझे घर’ योजना पुढे आणली तर दुसऱ्या बाजूने मयेवासीयांच्या जमिनी हडप करण्याचे कारस्थान सुरू आहे.

खनिज व्यवसायामुळे मयेतील लोक धूळ खात आहेत. मात्र सरकारला लोकांच्‍या या दुखण्याचे काहीच पडलेले नाही. उलट खाणमालकांना प्राधान्‍य दिले जात आहे. स्थानिक प्रश्‍‍नांना वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोवा फॉरवर्ड संघर्ष करणार आहे. तेव्हा जनतेने गोवा फॉरवर्डच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डची ताकद वाढली असून, झेडपी उमेदवार निश्चित निवडून येईल, असा विश्‍‍वास सरदेसाई यांनी व्‍यक्त केला.

Vijai Sardesai
Goa Forward: 'पोलिस आले, त्‍यांनी व्यासपीठावर जाऊन माईक बंद केला'! गावडोंगरीत अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्‍याचा गोवा फॉरवर्डचा दावा

श्री केळबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचार

उमेदवार प्रा. राधिका कळंगुटकर यांच्यासह केळबायवाडा-मये येथील श्री केळबाई देवीचे दर्शन घेऊन विजय सरदेसाई यांनी मयेतील प्रचारकार्याला प्रारंभ केला. यावेळी त्यांच्यासमवेत गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, संतोषकुमार सावंत, मंदार सरदेसाई, मये गट समितीचे अध्यक्ष वीरेंद्र पत्रे, आनंद पार्सेकर, प्रा. राजेश कळंगुटकर तसेच शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्‍थित होते. निवडून आल्यास मतदारसंघाचा विकास करण्यास मी कार्यरत राहीन, अशी ग्वाही प्रा. राधिका कळंगुटकर यांनी दिली.

Vijai Sardesai
Curti ZP Election: 'रवी नाईक' यांचे कार्य पुढे नेणार! रितेश यांचे प्रतिपादन; कुर्टीत भाजपचे प्रितेश गावकर यांचा प्रचार सुरू

भाजप सरकारच्या हुकूमशाहीला जनता कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे. भाजपला पदच्‍युत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी युतीचा प्रस्ताव पुढे आला आहे. आता युतीबाबतचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डने यापूर्वीच प्रचार सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड निवडणूक लढवणारच.

- विजय सरदेसाई, आमदार (गोवा फॉरवर्ड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com