Goa School Diwali Holiday Dates Changes:  Dainik Gomantak
गोवा

Goa School Diwali Holiday: गोव्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल; जाणून घ्या नव्या तारखा...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे सुट्ट्यांमध्ये केला बदल

Akshay Nirmale

Goa School Diwali Holiday Dates Changes: गोव्यात या महिन्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहे. त्याची जय्यत तयारी गोवा सरकारने केली आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

गोव्यातील शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 7 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आली होती. तथापि, गोव्यात 19 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

त्यामुळे शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. आता ही सुट्टी बुधवार 25 ऑक्टोबर 2023 ते शनिवार 18 नोव्हेंबर 2023 या काळात असणार आहे.

सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पासून शाळा दिवाळी सुट्टीनंतर पूर्ववत सुरू होतील, असे शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. दिवाळी सुट्टीतील या बदलाची सर्व विभाग प्रमुखांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT