Goa PWD: गोव्यातील 29 ब्लॅक स्पॉट दुरूस्त करणार; रस्ते अपघात टाळण्यासाठी PWD खर्च करणार 435 कोटी रूपये...

राज्यांत दरवर्षी अपघातांच्या संख्येत 12.9 टक्क्यांनी वाढ
Goa PWD To Rectify Black Spots on Roads:
Goa PWD To Rectify Black Spots on Roads:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa PWD To Rectify Black Spots on Roads: गोव्यात रस्ते अपघात टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पावले उचलण्यास सुरवात केली आहे. राज्यातील विविध रस्त्यांवरील धोकादायक अशा 29 ब्लॅक स्पॉट्सची (अपघात प्रवण क्षेत्र) दुरूस्ती करण्यात येणार आहे.

त्यासाठी 435 कोटी रुपये खर्च येणार आहे. यात रस्ता रुंदीकरण आणि जंक्शन दुरुस्ती या कामांचा समावेश आहे. हे नवीन निश्चित्त केलेले ब्लॅक स्पॉट आधीच्या 30 ब्लॅक स्पॉट्सहून वेगळे आहेत, असे सांगितले जात आहे.

राज्याच्या आकडेवारीनुसार गोव्यात दररोजचे अपघाताचे प्रमाण हे 7.8 इतके आहे. तर दरवर्षी अपघातांच्या संख्येत 12.9 टक्क्यांनी वाढ होत आहे. तसेच, रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण दरवर्षी 20.9 टक्क्यांनी वाढले आहे.

Goa PWD To Rectify Black Spots on Roads:
Goa Tourism: गोव्यातील मंदिरांना मिळणार नवी झळाळी; केपे, सत्तरी, काणकोण, सावर्डेतील मंदिरांचा समावेश...

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या सर्व रस्त्यांचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याची तयारी करत आहे. 2019 मध्ये, एका सल्लागाराने यापूर्वीच गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांचे ऑडिट केले होते.

आता, नवीन ऑडिटमध्ये राज्यभरातील सुमारे 1,134 किलोमीटरचे प्रमुख जिल्हा रस्ते आणि अंदाजे 4,430 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांचा समावेश अपेक्षित आहे.

जिल्‍हयाच्‍या आणि गावातील रस्‍त्‍याच्‍या रोड ऑडिटमध्‍ये साइनेज, स्‍पीड ब्रेकर्सचे अस्‍तित्‍व व परिमाणे, रस्‍त्‍याचे भौमितिक, ओव्हरटेकिंग डिस्‍टन्स, स्टॉपिंग डिस्‍टन्स आणि वळणे तपासण्‍यासाठी ग्राउंड सर्व्हेचा समावेश असेल. या सर्व्हेसाठी अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च येणार आहे.

Goa PWD To Rectify Black Spots on Roads:
Goa Open Defecation Free: राज्यात अद्यापही सुमारे 1850 घरांमध्ये नाही शौचालय

गेल्या वर्षी, पीडब्ल्यूडीने गोव्यातील रस्त्यांवरील 35 ब्लॅक स्पॉट्स निश्चित्त केले होते. अनेक ठिकाणी तीव्र वळणांची दुरूस्ती आणि रस्ता रुंदीकरणासाठी जमीन उपलब्ध नाही.

राज्यभरातील 12 ब्लॅक स्पॉट्स दुरूस्त करण्यासाठी जमिन संपादन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी केले होते. 150 स्पॉट्समध्ये रस्ते बांधणीतील दोष दूर केला गेला आहे. परंतु इतर 12 जागांवर मात्र भूसंपादनाला विरोध झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com