Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

Goa: विद्यार्थ्यांच्‍या शरीरात पाण्‍याची कमतरता असल्‍याने त्‍याचा परिणाम त्‍यांच्‍या शरीरावर होत असल्‍याचे गेल्‍या काही वर्षांत समोर आले होते.

Sameer Amunekar

पणजी: शालेय विद्यार्थ्यांच्‍या शरीरात पाण्‍याची कमतरता असल्‍याचे समोर आल्‍यामुळे दुसऱ्या आणि सहाव्‍या सत्रानंतर प्रत्‍येकी दोन अशी चार मिनिटे त्‍यांना पाणी पिण्‍यासाठी देण्‍यात यावीत, असे निर्देश शिक्षण खात्‍याने सर्वच शिक्षण संस्‍थांना जारी केले आहेत.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. विद्यार्थ्यांच्‍या शरीरात पाण्‍याची कमतरता असल्‍याने त्‍याचा परिणाम त्‍यांच्‍या शरीरावर होत असल्‍याचे गेल्‍या काही वर्षांत समोर आले होते.

त्‍यामुळेच दुसऱ्या आणि सहाव्‍या सत्रानंतर शिक्षण संस्‍थांनी विद्यार्थ्यांना चार मिनिटे पाणी पिण्‍यासाठी सोडावे, असे परिपत्रकात नमूद करण्‍यात आले आहे.

दरम्‍यान, या निर्णयाचे पालकांनी स्‍वागत केले आहे. विद्यार्थी हीतार्थ शिक्षण खात्‍याने योग्‍य पाऊल उचलले असल्‍याचा सूर पालकांनी व्‍यक्‍त केला. अलिकडे नवीन शिक्षण धोरणानुसार बरेच चांगले निर्णय घेतले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT