Ceiling collapse in government school in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: फॅननंतर आता सरकारी शाळेतील सिलिंग कोसळले; पाच विद्यार्थी जखमी, सांगेतील घटना

Sanguem News: उच्च माध्यमिक शाळेच्या छपराला अ‍ॅल्युमिनियमचे सिलिंग जोडण्यात आले होते. त्यापैकी काही भाग यापूर्वीच कोसळला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे: पर्ये -येथील शाळेच्या वर्गात गुरुवारी (ता.९) सिलिंग फैन पडल्याची घटना ताजी - असतानाच आज सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील सभागृहाचा सिलिंगचा काही भाग कोसळून पाच विद्यार्थी जखमी होण्याची घटना घडली.

पाचही जखमी विद्याथ्यर्थ्यांना तातडीने प्राचार्य सुदेश नाईक व इतर शिक्षकांनी - प्रथमोपचार करून सांग प्राथमिक - आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता पुढील तपासणी करण्यासाठी - सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात -पाठवून देण्यात आले आहे.

सविस्तर घटनेनुसार, उच्च माध्यमिक शाळेच्या छपराला अ‍ॅल्युमिनियमचे सिलिंग जोडण्यात आले होते. त्यापैकी काही भाग यापूर्वीच कोसळला होता. तर आता त्यातील काही भाग सकाळी १०.३० वाजता कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.

या हायरसेकंडरीच्या छपराचा आतील भाग उघडा असून लोखंडी जाळी न बसविल्यामुळे माकड आत घुसून छपरावर नाचतात त्यामुळे सिलिंग कोसळले. शिवाय अशीच घटना यापूर्वीही घडलेली असून या घटनेची माहिती यापूर्वीच शिक्षण खात्याला व सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आलेली आहे. आता दुसऱ्यांदा सिलिंग कोसळण्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT