Goa Scandal Dainik Gomantak
गोवा

Goa Scandal: मिलिंद नाईकांनी 'ते' प्रकरण खोटे असल्याचे सिद्ध करावे, अन्यथा...

या प्रकरणी आपण संबंधित पुराव्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार; संकल्प आमोणकर

दैनिक गोमन्तक

Goa Scandal: वासनाकांडासंबंधीचे जे आरोप करण्यात आले आहेत ते सत्य असल्याचे सांगून काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर, त्यांची पत्नी नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी श्रीदेव दामोदर समोरच्या श्रीफळावर हात ठेवून प्रमाण घेतले. सरकार, पोलीस (Police) यंत्रणा इत्यादींना मॅनेज करता येईल. परंतु जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती असलेल्या देवाला कोणी मॅनेज करू शकत नाही, असा दावा आमोणकर यांनी यावेळी केला. या प्रकरणी आपण संबंधित पुराव्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरगाव काँग्रेस महिला गट समितीने 21 रोजी पत्रकार परिषद आयोजित नाईक यांनी सोमवारी दामोदर मंदिरात येऊन श्रीफळावर हात ठेवून हे प्रकरण खोटे असल्याचे प्रमाण करावे, असे आवाहन करण्यात आले होते. तेव्हा संकल्प आमोणकर यांच्या कुटुंबानेही सदर प्रमाण करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे सोमवारी आमोणकर हे पत्नी श्रद्धा, दोन्ही मुले, आईवडील, भाऊ यांच्यासह दामोदर मंदिरात आले व त्यांनी श्रीफळावर हात ठेवून प्रमाण घेतले. भटजीने गाऱ्हाणे घातले. मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी मंदिरात येऊन सत्य सांगावे. हे प्रकरण येथेच संपवूया, असे आवाहन आमोणकर यांनी यावेळी केले. प्रकरण खोटे असते तर मी पत्रकार परिषद घेतल्यावर नाईक यांनी ते प्रकरण खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले असते. परंतु तसेच स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT