Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: पक्षविरोधी कारस्थाने केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही

विश्वजीत राणेंचा इशारा ः भाजपतर्फे वाळपईत पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane: सत्तरी तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांपासून आपण काम करीत आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून विकासाची दिशा गतिमान होत आहे. पक्षाचे कार्यकर्ते हीच खरी ताकद असते. सत्तरी तालुक्यात भाजप पक्ष मजबूत झालेला आहे.

त्यामुळे कार्यकर्ते, विविध समितीवरील पदाधिकारी यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, पण हे काम करताना कोणत्याही प्रकारची पक्षविरोधी कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत. पक्षविरोधात कार्यकर्त्यांनी काम केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.

वाळपई भाजपतर्फे आज सायंकाळी कार्यालयात आयोजित पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, `मेरी मिट्टी मेरा देश’अंतर्गत माती कलश प्रदान व पंचप्राण शपथबध्द कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार दिव्या राणे, नगराध्यक्ष शेहझीन शेख, वाळपई भाजप मंडळ अध्यक्ष रामनाथ डांगी, सगुण वाडकर, विनोद शिंदे, राजश्री काळे, देवयानी गावस, उमाकांत गावडे यावेळी उपस्थित होते.

विश्वजीत राणे पुढे म्हणाले, की आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. काय करावे, केव्हा करावे याची आपल्याला जाणीव आहे. सत्तरीत विविध विकासकामे पूर्ण करून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. करमळी गावात चांगली अंगणवाडीसाठीचे काम हाती घेतले आहे.

तसेच सत्तरीत नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वर्षभरात काम केले जाणार आहे. सर्वच कामे एकाचवेळी होणे शक्य नाही. टप्याटप्याने कामे हाती घेतली जातील. येत्या ऑक्टोबरपर्यंत विविध कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

विनोद शिंदे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत जमविलेली विविध भागातील माती कलशात एकत्र करून तो कलश विश्वजीत राणे व दिव्या राणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

तसेच पक्षासाठी व देशासाठी यावेळी सर्वांनी पणती हातात घेऊन पंचप्राण शपथ घेतली. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. गोवा मुक्तीच्या लढ्यात योगदान दिलेल्या पाच स्वातंत्र्यसैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात बाळकृष्ण सावंत, लाडको पालकर, भैरो वरक, गणेश आयकर, गणेश हरवळकर यांचा समावेश होता.

वन खात्याने लोकांशी संघर्ष करू नये...

राणे म्हणाले, सत्तरीत ग्रामीण भागातील लोक कष्टकरी जीवन जगत आहेत. त्यामुळे लोकांना जगण्याचा अधिकार आहे. वन खात्याच्या माध्यमातून पर्यावरण जतन व लोकांचेही तेवढेच रक्षण झाले पाहिजे. म्हणूनच वन खात्याने विनाकारण लोकांशी संघर्ष करू नये. तसा आदेशही वन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT