School  Dainik Gomantak
गोवा

Sattari News: बोलक्या भिंतीतून मुलांना शिक्षण; समग्र शिक्षा अभियानाचा अभिनव उपक्रम

Sattari News: हा उपक्रम खरोखरच एक प्रभावी अध्यापनासाठीचे माध्यम बनणार आहे. शिक्षकांना यामुळे मुलांना शिकविण्यास फारच सुटसुटीत होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News:

पद्माकर केळकर

प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या जडणघडणीतील मुख्य पाया मानला जातो. शालेय प्राथमिक जीवनात मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात चांगले संस्कारमय शिक्षण दिले, तर मुलांचे पायाभूत शिक्षणही तेवढेच मजबूत होऊन मुले भविष्यात चांगले उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधत असतात.

सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागात धावे सरकारी प्राथमिक शाळेत नावीन्यपूर्ण असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. समग्र शिक्षा अभियानातर्फे शाळेतील भिंतींना पेंटिंग कामासाठी निधी देण्यात आला होता.

हे पेंटिंगचे काम करतानाच भिंतीवर वैविध्यपूर्ण अशी शैक्षणिक कलाकृती रेखाटण्याचा विचार मनी आला व होंडा येथील युवा चित्रकार दीपक गावकरच्या मदतीने सध्या शैक्षणिक कलाकृती चित्रीत करीत आहे. अतिशय सुरेख अशी चित्रे रंगविली आहेत.

शाळेच्या भिंतीवर विविध चित्रे काढून शैक्षणिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बोलक्या भिंती, सर्जनशील चित्राकृती, चित्रकला भिंतीवर करण्यात आलेली आहे.

हा उपक्रम खरोखरच एक प्रभावी अध्यापनासाठीचे माध्यम बनणार आहे. शिक्षकांना यामुळे मुलांना शिकविण्यास फारच सुटसुटीत होईल. तसेच मुलांच्या जडणघडणीत एक प्रभावी उपयोग होईल.

बारा महिने, सात वार (इंग्रजी व मराठी), प्राणी, सूर्य, चंद्र, बाराखडी, स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र असे प्रकार भिंतींवर रेखाटले आहेत. शिक्षा अभियानचे आम्ही आभारी आहोत, असे धावे स. प्रा. शाळेचे शिक्षक दुलो गावकर म्हणाले.

चित्रांतून शैक्षणिक विकास पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र भाटेकर म्हणाले, सरकारी प्राथमिक शाळा विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे दररोज मुले आनंदाने शाळेत येतात.

धावे शाळेत भिंतींवर अभ्यासू अशी चित्रे कोरलेली आहेत. याचा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी चांगला उपयोग होणार आहे. शिक्षकांप्रमाणे मुलेही आता एकमेकांना शिकवत आहेत.

समग्र शिक्षा अभियानने पेंटिंगसाठी निधी दिला. केवळ भिंत रंगविण्याबरोबरच त्या भिंतींवर शैक्षणिक माहिती रेखाटली तर मुलांना प्रत्यक्षात अभ्यास करणे सहज सोपे होणार आहे. रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बहुतांश काम झाले आहे. त्याचा उपयोग होतो आहे.

- दुलो गावकर, शिक्षक शाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT