Mapusa City: वाहतूक कोंडीनंतर आता म्हापश्यात बेवारस वाहनांची समस्या

Mapusa City: पालिका वाहनमालकांना नोटीस बजावणार
Mapusa City
Mapusa CityDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa City: म्हापसा येथील पालिकेची उदासीनता व पोलिसांच्या तांत्रिक अडचणींमुळे शहरातील बेवारस आणि भंगार वाहनांची समस्या कायम आहे.

सध्या शहरातील रस्त्यांच्या बाजूला अनेक वाहने धूळ खात उभी असलेली दिसतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावरून हटवावी.

शहरातील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची नोंद घेऊन या वाहनांच्या मालकांना पालिकेकडून नोटीस पाठवली जाईल. तसेच पोलिसांमार्फत या वाहनांवर कारवाई करण्याचा विचारविनिमय सुरू असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा पालिका कार्यक्षेत्रात विशेषतः शहर परिसरात रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर तसेच वाहन दुरुस्ती गॅरेजसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करून ठेवलेली आहेत.

ही बहुतेक वाहने बंदवस्थेत आहेत. ती अनेक वर्षे या ठिकाणाहून हटविली गेलेली नाहीत. परिणामी, या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होतो. तसेच पार्किंगचीही समस्या निर्माण होते. याशिवाय पावसाळ्यात ही वाहने डास पैदास केंद्रे ठरू लागली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Hazmat Response Vehicle Goa
Student Safety In Mapusa
Goa Electric Vehicle Registrations
Patto Bridge traffic violations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com