Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: सत्तरीत आग लागण्याच्या प्रकारणांत वाढ; एकाच वेळी पाच ठिकाणी आगीच्या घटना..

Goa Fire: शेळ मेळावली येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेली आग विझविण्यात जवानांना यश आले

Ganeshprasad Gogate

Goa Fire: सत्तरी गेल्या काही दिवसापासुन अनेक ठिकाणी आग लागण्याची घटनेत वाढ झाली आहे. आज शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली येथील कचरा प्रकल्पाच्या शेडीला आग लागुन येथे असलेला कचरा पुर्ण जळुन खाक झाला आहे.

तसेच येथे असलेली पत्र्याची शेड जळाली. तसेच गुळेली येथे पुलाजवळ रस्त्याच्या बाजुला आग लागली, त्याचवेळी पाडेली पुलाजवळ काजु झाडाच्या बाजुला आग लागली.

त्याचबरोबर गुळेली येथे आणखी एका ठिकाणी आग लागली. महत्वाचे म्हणजे एकाच पंचायत क्षेत्रात व एकाच मार्गावर ही आग लागली होती.

यावेळी वाळपई अग्नीशमनचा दलाच्या जवानांना या घटनेची माहीती मिळताच दोन गटातील सर्व परिसराची आग पाण्याच्या फवारा मारुन आटोक्यात आणली.

त्याचबरोबर शेळ मेळावली येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेली आग विझविण्यात जवानांना यश आले. यावेळी जवानानी आग इतत्र जावू नये म्हणून खबरदारी घेतली.

मात्र त्या ठिकाणी प्लास्टिक कचरा असल्याने आग पेटणी सुरु होते. त्यामुळे गुळेली पंचायतीतर्फे उपाय योजना करण्यात येत आहे.

यावेळी मिळालेली मिळाती नुसार एकाच वेळी एकाच मार्गावर ही आग लागली होती. त्यामुळे ही आग जाणुन बुजून लावल्याचा अंदाज वर्तवीला जात आहे.

मेळावली येथील कचरा प्रकल्पात असलेली शेड जळाली त्यामुळे अंदाजे 25 हजाराच्या वर शेडीचे नुकसान झाले आहे.

यावेळी अग्नीशमन दलाचे सहाय्यक अधिकारी श्रीकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद नाईक, रुपेश सालेलकर, सोमनाथ गावकर, प्रितेश गावकर, प्रदीप गावकर, अशोक नाईक, रुपेश गाकर आदींनी मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT