Bicholim Land Fraud Goa Dainiak Gomantak
गोवा

Sarvan Comunidade Land Scam: सर्वण कोमुनिदादची 25 हजार मीटर जमीन परस्पर फस्त, मोठा आर्थिक घोटाळा उघड; गावकऱ्यांना अंधारात ठेवून बिल्डरला जमिनीची विक्री

Bicholim Land Fraud Goa: डिचोली तालुक्यातील सर्वण कोमुनिदादची जमीन परस्पर विकण्याचा प्रकार घडला असून या गैरव्यवहारातून मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: डिचोली तालुक्यातील सर्वण कोमुनिदादची जमीन परस्पर विकण्याचा प्रकार घडला असून या गैरव्यवहारातून मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसा संशयही गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हा घोटाळा उघड झाल्याने सर्वण गावात सध्या खळबळ माजली असून सध्या हे घोटाळ्याचे प्रकरण गावात खदखदू लागले आहे.

या घोटाळ्याची ‘भांडाफोड’ करण्यासाठी कोमुनिदादचे सदस्य असलेले सावंत गावकरी आता संघटित झाले असून, ते आक्रमक बनले आहेत. गावकऱ्यांना अंधारात ठेवून कोमुनिदाद मंडळाच्या काही पदाधिकऱ्यांनी कोमुनिदादची जमीन बेकायदेशीरपणे विकली असून, या घोटाळ्यात एक स्थानिक वकीलही सामील आहे. असा संशय आहे. तशी चर्चाही सध्या गावात चालू आहे. सर्वण येथील सर्वे नं. १९/२ ही कोमुनिदादशी संबंधीत सुमारे २५ हजार चौरस मीटर जमीन दिल्लीस्थित एका बड्या बिल्डरला बेकायदेशीरपणे विकल्याची माहिती उघड झाली आहे.

हा गैरव्यवहार उघड होताच, कोमुनिदादची बैठक घ्यावी, अशी बहुतांश गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी करुनही कोमुनिदाद मंडळाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. उलट या आर्थिक घोटाळ्यात ज्यांची नावे पुढे आली आहेत, ते गप्पच आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. कोमुनिदादची जमिन बळकावण्याच्या प्रकाराबाबात ग्रामस्थांनी आज बैठकीत विविध शक्यतावर चर्चा करण्या आली.

देवाला गाऱ्हाणे घालण्‍याचा निर्णय

या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) रात्री उशिरा सर्वण कोमुनिदादशी संबंधित गावकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक श्री श्यामपुरुष मंदिरात घेण्यात आली. या बैठकीस पन्नासहून अधिक गावकरी उपस्थित होते. कोमुनिदादीच्या घोटाळ्या प्रकरणी पुढील कृती करण्यापूर्वी देवासमोर गाऱ्हाणे घालण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित सर्व गावकऱ्यांनी सहमती दिली. घोटाळ्यामागील प्रमुख सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडे गावकरी अंगुलीनिर्देश करतात. त्यांना बोलावून देखील ते या बैठकीला मात्र उपस्थित राहिले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT