Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple Leakage: नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिराला गळती, नूतनीकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

चौकशीचे निर्देश : नूतनीकरण काम निकृष्‍ट : पुरातत्व खात्याचे मंत्री फळदेसाईंकडून पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Saptakoteshwar Temple Leakage नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात पावसाच्या गळतीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मंदिराच्‍या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे बोलले जात आहे. ही बाब कानावर पडताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज बुधवारी सकाळी या मंदिराच्या कामाची पाहणी केली.

नूतनीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसताच मंत्री फळदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या कामाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

पुरातत्व खात्यातर्फे सुमारे सात कोटी रुपये खर्चून पाच महिन्यांपूर्वी या शिवकालीन इतिहास आणि गोमंतकीयांचे राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्‍यात आले होते.

गेल्या ११ फेब्रुवारी रोजी या कामाचे लोकार्पणही करण्यात आले आहे. नूतनीकरण केल्यानंतर पहिल्या पावसाळ्यातच या मंदिरात गळतीची समस्या निर्माण झाली. मंदिराच्या गर्भकुडीवरील घुमटीतून पावसाचे पाणी गळत आहे. तसेच लाद्या बसवूनही जमिनीखालून पाणी झिरपत आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या समस्येची बारकाईने पाहणी केली. मंदिरात वीजजोडणी आदी काम व्यवस्थित केले नसल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. या प्रकाराबद्दल त्‍यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला.

कामासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आणि संबंधितांना बरेच फैलावर घेतले.

यावेळी नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, पंच तुकाराम गावडे, देवस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई, पुरातत्व खात्याचे संचालक वरद सबनीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, अन्य खात्यांचे अधिकारी, कंत्राटदार आणि कन्सल्‍टंट उपस्थित होते.

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्‍याकडूनही नाराजी : श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरण कामाबाबत आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. कन्सल्टंट आणि संबंधितांकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे त्‍यांनी सांगून या प्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच कायमस्‍वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी त्‍यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली.

दोषींवर कडक कारवाई करणार

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे नूतनीकरण केल्यानंतर पूर्वी नसलेल्या समस्या निर्माण होणे, ही बाब गंभीर आहे. यावरून हे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

पुरातत्व खात्यातर्फे मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी काम आणि कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT