Goa Sugarcane farmers Dainik Gomantak
गोवा

इथेनॉलसंदर्भात धोरण स्पष्ट करा, अन्यथा रस्त्यावर उतरु; ऊस उत्पादकांचा सरकारला इशारा

जमिनी परत मिळवण्यासाठी उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Sanjivani Sugar Factory : सरकाने संजीवनी सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प होणार की नाही यासंदर्भात लवकरात लवकर आपले धोरण स्पष्ट करावे, अन्यथा आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा स्पष्ट इशारा ऊस उत्पादकांनी आज झालेल्या सर्वसाधरण बैठकीत दिला.

यावेळी गोमंतक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, हर्षद प्रभुदेसाई, गुरुदास गाड, दामू गवळी, फ्रान्सिस मास्करेन्हस, तसेच समितीचे इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

ऊस उत्पादक सुविधा समितीत ॲड. नरेंद्र सावईकर अध्यक्ष आहेत, ते भाजपचे असल्याने शेतकऱ्यांबाबतीत ठोस निर्णय घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटत नाही, तेव्हा त्यांना या समितीतून काढुन टाकावे अशी मागणी केली व सर्वांनी यास अनुमोदनही दिले. याविषयी आम्ही सरकारला कळविणार असल्याचे ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारने परस्पर महाविद्यालयासाठी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायलयात याचिका दाखल करावी व आमच्या जमिनी परत घ्याव्या अशी मागणी ऊस उत्पादकांनी केली.

सरकारने संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद केला जाईल, तेव्हा पाच वर्षांपर्यंत ऊस उत्पादकांना सरकारकडून भरपाई दिली जाईल असे सांगितले होते. काही ऊस उत्पादक शेतकऱ्याना पैसेही मिळालेले आहेत, तर 198 शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिलेले नाहीत असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले.

तेव्हा मुख्यमंत्र्यांजवळ आम्ही याविषयी बोललो असून ज्यांना पैसे दिले नाहीत, त्या शेतकऱ्यांची नावे पाठवावी असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले असून आम्ही ही नावे लवकर पाठविणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

उस उत्पादक खुशाली मामलेकर, शशिकांत वेळीप, नेमू मडकईकर, राजेंद्र देसाई, फ्रान्सिस मास्करेन्हास, ॲड. मोहन सावईकर आदींनी विविध ठरावावर चर्चा केली.

एकत्र लढ्याचा निर्धार

ऊस उत्पादकांच्या रविवारी झालेल्या या सभेत एकमेकांविरुद्ध वाद प्रतिवाद, आरोप - प्रत्यारोप झाले, पण शेवटी झाले गेले विसरून जावे अशी भूमिका शेतकऱ्यानी घेऊन संजीवनी सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला.

तसेच खुशाली मामलेकर हे आपल्या सर्व दस्तऐवजासह आम्हाला सहकार्य करणार असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

इथेनॉल प्रकल्पाचे स्वागतच करू

सरकार जर संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये इथेनॉलचा प्रकल्प आणू इच्छित असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करू, पण गेल्या तीन वर्षांपासून सरकार या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केवळ आश्वासने देत आहे. तो कधी सुरू करणार हे स्पष्ट सांगत नाही. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याच्या धोरणासंदर्भात सरकारने लवकर स्पष्टीकरण करावे, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT