गोव्यात मागील वर्षी 'कोट्यवधीं'चे अंमली पदार्थ जप्त; विदेशी आणि परराज्यातील नागरिकांचा लक्षणीय सहभाग

अंमली पदार्थ प्रकरणांची आकडेवारी पोलिस खात्यामार्फत जारी करण्यात आली आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून यामध्ये अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असल्याचे समोर आले आहे. राज्याचे अंमलीपदार्थविरोधी पथक, क्राईम ब्रँच किनारपट्टी भागावर तसेच राज्यात इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्रेते व दलालांवर कारवाई करत आहे.

राज्यात पोलिसांनी केलेल्या अंमली पदार्थविरोधी कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंत यावर्षी जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने एकत्रित मिळून 70 अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद केली आहे. तर 2022 मध्ये 155 अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद केली होती.

2021 मध्ये 2 कोटी 74 लाख 26 हजार रुपये व 2022 मध्ये 1 कोटी 2 लाख 67 हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 2021 व 2022 मध्ये परराज्यातील नागरिकांचा या प्रकरणांमध्ये जास्त सहभाग असल्याचे आढळून आले आहे तर परदेशी नागरिकांमध्ये नायजेरियन नागरिकांचा जास्त सहभाग असल्याचे आकडेवारी सांगते.

Goa Drug Case
Goa Accident News : धाडे सावर्डे येथे कलंडला ट्रक; सुदैवाने बचावला चालक

राज्यात किती अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद झाली याची आकडेवारी पोलिस खात्यामार्फत जारी करण्यात आली आहे. 2023 यावर्षी आतापर्यंत जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने एकत्रित मिळून 70 अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद केली आहे. यात अंमलीपदार्थविरोधी पथकाने 20, क्राईम ब्रँच पथकाने 11, जिल्हा पोलिसांनी 39 प्रकरणांची नोंद केली आहे.

2023 यावर्षी आतापर्यंत एकूण 85 जणांना अटक करण्यात आली असून यात 25 गोव्यातील नागरिकांना, 53 परराज्यातील तर 11 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 71 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

Goa Drug Case
Goa Monsoon Update: गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा; आजपासून दोन दिवस ऑरेन्ज तर, मंगळवारपासून यलो अलर्ट

2022 मध्ये जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने एकत्रित मिळून 155 अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद केली आहे. यात अंमलीपदार्थविरोधी पथकाने 29, क्राईम ब्रँच पथकाने 25, जिल्हा पोलिसांनी 101 प्रकरणांची नोंद केली आहे.

यात एकूण 184 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 207 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये 54 गोव्यातील नागरिकांना, 101 परराज्यातील तर 29 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

2021 मध्ये जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने एकत्रित मिळून 121 अंमली पदार्थ प्रकरणांची नोंद केली आहे. यात अंमलीपदार्थविरोधी पथकाने 24, क्राईम ब्रँच पथकाने 13, जिल्हा पोलिसांनी 84 प्रकरणांची नोंद केली आहे.

2021 यावर्षी एकूण 134 जणांना अटक करण्यात आली असून यात 24 गोव्यातील नागरिकांना, 89 परराज्यातील तर 21 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 129 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com