Sanguem Flood  Dainik Gomantak
गोवा

Sanguem: गाड्या अडकल्या, वाहतूक ठप्प! सांगेत जोरदार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब; गटारे तुंबल्‍याने पाणी थेट रस्त्यावर

Sanguem Rain: व्‍हालशे पुलाची उंची बरीच कमी असल्यामुळे पावसाचा जोर वाढताच तो पाण्याखाली जातो. वर्षातून दोन-तीन वेळा तरी हा प्रकार घडतोच. दोन्ही बाजूंनी वाहनचालक अडकून पडतात.

Sameer Panditrao

सांगे: सांगे भागात पावसाने जोर धरला आहे. नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्‍या पाण्‍याने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. येथील व्‍हालशे भाटी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली असून दोन्‍ही बाजूंचा संपर्क तुटला आहे.

व्‍हालशे पुलाची उंची बरीच कमी असल्यामुळे पावसाचा जोर वाढताच तो पाण्याखाली जातो. वर्षातून दोन-तीन वेळा तरी हा प्रकार घडतोच. पूल पाण्याखाली गेल्‍यानंतर पुराचे पाणी ओसरेपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनचालक अडकून पडतात. परिणामी भाटी-सांगे, वाडे-कुर्डी, नेत्रावळीपर्यंत वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत असते.

संजीवनी साखर कारखाना सुरू असताना दर दिवशी या पुलाच्या वरील भागात ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या गती मिळत नसल्याने खोळंबून पडत असे. त्यावेळीही ऊसउत्पादक व्‍हालशे येथे नवीन पूल बांधण्याची मागणी करत होते. सरकारने ही समस्‍या तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

रात्रीच्‍या वेळी मोठा अनर्थ घडण्‍याची वाहनचालकांना भीती

डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे दिवसा व्‍हालशे येथील पूल पाण्याखाली गेल्यास वाहनचालक प्रतीक्षा करीत थांबतात. पण रात्रीच्या वेळी पूल पाण्याखाली गेल्यास काळोखात आणि विशेषत: पूल उतरणीवर असल्यामुळे अनर्थ घडण्‍याची भीती असते. हा पूल एकदम कमी उंचीचा आहे. त्यात दोन्ही बाजूंनी वळण असल्यामुळे नेहमीच वाहतूक करणाऱ्यांना त्रास होत असतो.

गटारे तुंबल्‍याने पाणी थेट रस्त्यावर

सांगे भागात पावसाने जोर धरल्‍याने सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पण त्‍यास फक्त पाऊस जबाबदार नाही तर सार्वजनिक बांधकाम खातेही तितकेच जबाबदार असल्याचे लोक बोलू लागले आहे. पालापाचोळा आणि दगडधोंड्यांनी गटार भरल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. चिरेबांध, उगे-सांगे येथील सर्वच रस्त्यांवर हीच स्थिती आहे.

वीज खात्‍याचे कर्मचारी मान्‍सूनपूर्व कामे करताना झाडांची छाटणी करून पालापाचोळा, फांद्या रस्त्यालगतच्या मातीच्या गटारात टाकून देतात. पाऊस पडल्यानंतर डोंगरमाथ्यावरील पावसाचे पाणी सोबत माती, दगडधोंडे घेऊन खाली येते. या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते गटारे सोडून भररस्त्यावरून ओहोळाप्रमाणे वाहू लागतात. त्यातून दुचाकी चालविणे खूप कठीण होते. पाण्यासोबत दगड माती रस्त्यावर विखुरलेली असते. ही स्‍थिती फक्त चिरेबांध, उगे-सांगे येथील नाही तर संपूर्ण सांगे भागातील रस्त्यांची आहे. कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अधिकारीवर्गाने निरीक्षण केल्यास उपाययोजना आखणे सोपे जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT