Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Sanguem Problems: मासळी मार्केटकडे जाणारी वाट पावसाळ्यात निसरडी होत असते तर इतर हंगामात कार्यालयांतील सांडपाणी या वाटेच्‍या पेव्हर्सवरून वाहत असल्यामुळे लोकांचा जीव धोक्‍यात आला आहे.
Sanguem Problems
Sanguem ProblemsDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: पालिकेने मासळी विक्रेत्‍यांसाठी स्वतंत्र मार्केट बांधून दिले खरे, पण तेथील समस्या काही सोडविल्‍या नाहीत. मासळी, चिकन, मटण एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने या मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. पण या मार्केटमध्ये जाण्यासाठी असलेली वाट निसरडी आणि अरुंद आहे. त्‍यामुळे कित्‍येक लोक घसरून पडले आहेत. पावसाळ्यात तर या मार्केटमध्‍ये जाणेच नको अशी स्‍थिती असते. विशेष म्‍हणजे पालिकेचे त्‍याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

मासळी मार्केटकडे जाणारी वाट पावसाळ्यात निसरडी होत असते तर इतर हंगामात कार्यालयांतील सांडपाणी या वाटेच्‍या पेव्हर्सवरून वाहत असल्यामुळे लोकांचा जीव धोक्‍यात आला आहे. ग्राहक कमी झाल्‍यामुळे मासळी विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागत आहे. अशा धोकादायक बाजारात जाण्‍यापेक्षा लोक रस्त्याच्‍या बाजूला बसून विक्री करणाऱ्यांकडूनच मासळी खरेदी करण्‍याला प्राधान्‍य देतात. परिणामी मार्केटमधील विक्रेते ग्राहकांच्‍या प्रतीक्षेत बसलेले दिसून येतात.

मार्केटमध्ये मासळी, चिकन, मटण विक्रेत्यांच्या दुकानांतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधण्यात आलेले आहेत. मात्र सांडपाणी गटारांतून वाहून न जाता तेथेच तुंबून राहते. परिणाम विक्रेत्यांना आणि ग्राहकांनाही दुर्गंधी सहन करावी लागते. मग मासळी विक्रेत्यांनी आवाज उठविल्‍यानंतर तुंबलेले गटार स्‍वच्‍छ केले जातात. पण त्‍यापूर्वी पालिकेला जागच येत नाही.

सांगेचा बाजार... ‘नको रे बाबा’

सांगेतील आठवड्याचा बुधवारचा बाजार भरतो, त्‍या जागेत विक्रेते कसे बसतात हेच समजत नाही. ग्राहकही बाजारात नाक मुठीत धरूनच खरेदी करताना दिसतात. तेथील दुर्गंधीमय वातावरण, त्यात पावसामुळे झालेला चिखल आणि डासांची झालेली पैदास यामुळे ‘आम्‍हांला हा बाजारच नको’ असे म्‍हणण्‍याची वेळ लोकांवर आली आहे.

विरंगुळ्‍यासाठी ‘नेहरू पार्क’ एकमेव साधन!

सांगे पालिकेचे ‘नेहरू पार्क’ हे फार पूर्वीपासून एकमेव असे शहरातील विरंगुळा केंद्र आहे. या पार्कचे खास वैशिष्ट्य म्हणजे पालिका तेथे संध्‍याकाळच्‍या वेळी रेडिओ लावून गोव्यातील घडामोडी तसेच कोकणी-मराठी गाणी ऐकण्याची संधी उपलब्ध करून देत असे.

Sanguem Problems
Sanguem: रस्त्यावर चिखल, सांडपाण्याच्या दुर्गंध आणि तिथेच भरतोय आठवडी बाजार; सांगेतील दुरावस्था, विक्रेते-ग्राहक हैराण

बाजार संकुलाचे ‘ग्रहण’ सुटेनाच!

सांगे पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी बाजार संकुल उभे करण्यासाठी पाहिला टप्पा पूर्ण केला. त्यात तळाला गोवा स्टेट बँक, एक-दोन दुकाने तर आतील भागात भाजीविक्रेत्यांसाठी सोपे बांधून दिले. पण ते एवढे उंच आहेत की कोणीही त्‍यांचा वापर करत नाहीत. वरच्या भागात उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले आहे. त्याला खेटूनच मासळी मार्केट. मात्र त्या पुढील दुसरा टप्पा सुरू करण्यास पालिकेला अजून यश आलेले नाही.

Sanguem Problems
Sanguem: शेतकरी फसला पाण्यात! अवकाळीमुळे पिकाचे नुकसान, जनावरांना चाराही नाही; बळीराजावर उपासमारीची वेळ

‘टाऊन हॉल’ची मोकळी‍ जागा

सांगे पालिकेने जीर्ण जुन्या टाऊन हॉलची इमारत पाडल्‍यानंतर तेथे मोकळ्या झालेल्या जागेत कोणता प्रकल्प उभारावा, याबाबत अद्याप कोणतीही हालचाल केलेली नाही.पालिकेवर महिला राज्य आहे. अलिखित करारानुसार तेथे संगीतखुर्चीचा खेळ सुरू आहे. आता चौथ्‍या महिला नगराध्यक्षा म्हणून संतीक्षा गडकर विराजमान झालेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com