Goa Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: नदीपात्रातून टोपलीभर रेती मिळणेही मुश्कील; बेकायदा उपशाविरोधात कोर्ट आक्रमक

उत्‍खननासाठी कायदेशीर परवाने नाहीत

दैनिक गोमंतक

Goa Sand Mining: एका बाजूने सरकार कायदेशीरपणे रेती काढण्यासाठी परवाने देत नाही आणि दुसरीकडे बेकायदा रेती उपशाविरोधात कडक कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसोबत सर्वसामान्यांसमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे.

आजच्या घडीला नदीच्या पात्रातून एक टोपली भरूनही रेती कायदेशीरपणे काढता येणार नाही, अशी स्थिती आहे.

यामुळे राज्याबाहेरून रेती पुरवठा करणाऱ्यांचा धंदा फोफावला आहे. रेतीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केव्हाच गेले आहेत. घर दुरुस्तीसाठी लागणारी मालवाहू रिक्षाभर रेतीही अव्व्याच्या सव्वा दराने घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.

गेली तीन चार वर्षे कायदेशीरपणे रेती काढण्यासाठी परवाने देण्यासाठी सरकारी पातळीवर चालढकल सुरू आहे. पर्यावरण दाखले करवून घेण्यासाठी रेतीचा किती साठा आहे याच्या अभ्यासातच महत्त्वाची वर्षे वाया गेली आहेत.

सरकारने तेरेखोल आणि शापोरा नदीच्या पात्रात काही ठिकाणी रेती काढण्यासाठी परवाने दिले होते; मात्र उच्च न्यायालयाने यासाठी राबवलेल्या प्रक्रियेबाबत डोळे वटारताच सरकारची घाबरगुंडी उडाली आणि तेही परवाने आम्ही न्यायालयाच्या निर्णयापर्यंत निलंबित ठेवतो, असे सरकारने सांगितले आहे.

असे असले तरी रेतीची वाढती मागणी आणि वाढलेले दर लक्षात घेता बेकायदा रेती काढण्याला जोर आला आहे. त्याविषयी उच्च न्यायालयासमोर पुरावे पोचताच पोलिस महासंचालकांना उद्याच न्यायालयात पाचारण करण्याची तयारी न्यायालयाने केली होती.

कारवाईसाठी कशीबशी आठवडाभराची मुदत

  1. राज्‍य सरकारतर्फे उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या सहायक महाअधिवक्त्यांनी आज कशीबशी आठवडाभराची मुदत बेकायदा रेती काढणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी मागून घेतली आहे.

  2. न्यायालयाने आठवडाभरात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांची बैठक घेण्यास बजावले आहे.

  3. यामुळे बेकायदा रेती काढणाऱ्यांविरोधातील कारवाईला उद्यापासून न्यायालयाला दाखवण्यासाठी गती दिली जाणार आहे, असे आज उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT