आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

Web3 On the Sea: बार्जच्या डिझाईन, दुरूस्तीचे काम सुरू
Web3 On the Sea
Web3 On the SeaDainik Gomantak

Rohan Khaunte on Web 3 on the sea: कोराना काळापासून जगभरातील कामांच्या ट्रेंड्समध्ये आणि वर्क कल्चरमध्येही बदल झाले. विविध कंपन्यांनी या काळात कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची सुविधा दिली होती.

लॅपटॉपवरून काम करू शकणाऱ्या अनेक क्षेत्रातील लोकांना वर्क फ्रॉम होम सुविधेचा चांगला लाभ झाला होता. दरम्यान, आता अशा जगभरातील कर्मचाऱ्यांना गोव्यातून काम करण्याची संधी असणार आहे.

कारण, गोवा सरकारच आता अशा कर्मचाऱ्यांसाठी गोव्यात चक्क समुद्रात ऑफिस उभारण्याची योजना आखत आहे.

Web3 On the Sea
Goa BJP: लोकांचा भाजपवर विश्वास असल्याचे सिद्ध - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; गोवा भाजपचा जल्लोष

वेब ३ ऑन द सी या मंचाच्या माध्यमातून या सुविधा पुरविण्यात येणार आहे. नुकतेच गोव्याचे पर्यटन आणि आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली. दरम्यान, सरकारचा माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग या प्रकल्पाला मदत करणार आहे.

यात एक नूतनीकरण केलेले जहाज जे समुद्रात असेल. त्यामध्ये बैठकांसाठी खोल्या, 5G-कनेक्ट केलेले कार्यक्षेत्र आणि खोल्या असणार आहेत. अगदी कामाचा कंटाळा आल्यास मनोरंजनासाठीही जागा असणार आहे.

सध्या काही बार्ज ज्या बंदर कप्तान खात्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांच्या सजावट आणि दुरूस्तीचे काम सुरू आहे. भारतातील हे अशा प्रकारचे पहिलेच फ्लोटिंग को वर्किंग स्पेस ऑफिस असणार आहे.

Web3 On the Sea
Goa Agri Societies: गोव्यातील कृषी सोसायट्याही विकू शकतील पेट्रोल, एलपीजी, औषधे...

येथे ब्लॉक चेन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इनोव्हेटर्स, इनक्यूबेटर्स आणि तांत्रिक सहाय्य स्टार्टअप्स यांना येथे चांगले वातावरण लाभेल. हा प्रकल्प W3BONTHESEA-Oceancrest Pvt Ltd च्या मालकीचा आहे.

या कंपनीत भागीदारी असलेल्या इंडिया ब्लॉकचेन अलायन्सचे संस्थापक राज कपूर यांनी, ऑफशोअर सुविधांचा समावेश Web3onTheSea साठी गेम चेंजर ठरेल, असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com