Gold theft caught and bitten at Saligao  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वृद्धेची फसवणूक करण्याचा डाव फसला, दागिने पॉलिश करणाऱ्या दोघांना चोप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: दागिने पॉलिश करण्यासाठी घरात घुसलेल्या बिहारच्या दोघा तरुणांना जमावाने साळगावमध्ये पकडून बेदम चोप दिला. दागिने पॉलिश करण्याच्या इराद्याने फसवणूक करण्याचा या तरुणांचा डाव होता, असा आरोप स्थानिकांनी केला. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी (ता.१६) सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली नव्हती.

मोहम्मद एजाज आणि सत्तार (दोघेही रा. बिहार) हे दोन तरुण साळगाव येथे कायतान यांच्या घरात शिरले. यावेळी कायतान यांची वृद्ध आई एकटीच होती. हीच संधी हेरून या तरुणांनी तिला दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितल्यानंतर वृद्धेने सोनसाखळी त्यांना दिली. तेव्हा अचानक कायतान घरी परतले असता, त्यांनी दोघांना घराबाहेर काढले.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

त्यांच्या बोलण्यात संदिग्धता दिसून आल्याने संतप्त जमावाने दोघांना बेदम चोप दिला आणि या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या व्हिडिओच्या माध्यमातून अशा भामट्यांना घरात प्रवेश देऊ नका, दागिने पॉलिश करण्याच्या नावाने लोकांची फसवणूक करणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचा संदेश या लोकांनी दिला. मात्र, याप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल झाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भूतानी प्रकल्पावरुन गोव्यात वाद का होतोय? गावकऱ्यांची न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

Goa Today's News Live: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ओडिशाच्या एकास अटक, 9 किलो गांजा जप्त

CRZ चे उल्लंघन भोवले, हरमल बीच भागातील सात अवैध बांधकामांवर हातोडा; आठ बाकी

Bhutani Infra: भूतानी प्रकल्‍पावरुन सावंत सरकार अडचणीत, मालकी हक्‍क न तपासता परवाना दिल्‍याचा आरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT