Salgaon Waste Project Dainik Gomantak
गोवा

Salgaon Waste Project: साळगाव प्रकल्पात दक्षिण गोव्यातील कचरा? स्थानिकांनी कचरावाहू ट्रक रोखला!

सोनसोडोवरून पिळर्णमार्गे येणारा एक कचरावाहू ट्रक शनिवारी सकाळी स्थानिकांनी अडविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Salgaon Waste Project साळगाव कचरा प्रकल्पात सोनसोडोवरून पिळर्णमार्गे येणारा एक कचरावाहू ट्रक शनिवारी सकाळी स्थानिकांनी अडविला. हा ट्रक मडगाव पालिकेचा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, साळगाव कचरा प्रकल्पात दक्षिण गोव्यातील कचरा प्रक्रियेसाठी आणत असल्याने स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

कारण बाहेरील कचरा आणल्यास प्रकल्पावर अतिरिक्त ताण पडून अकार्यक्षम बनेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या ट्रकमधील कचरा रस्त्यावर सांडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोकांनी तो रोखला व दुर्गंधीयुक्त पाणी तसेच कचरा रस्त्यावर सांडत असल्याने जाब विचारला.

या वाहनातून कचऱ्याचे पाणी साडू नये यासाठी ट्रकला योग्यरीत्या लिचेट टाकी बसविली नव्हती असे स्थानिकांनी सांगितले. याशिवाय ओव्हरलोडमुळे ट्रकमधील कचरा रस्त्यावर सांडत होता.

‘साळगावात क्षेमतेपेक्षा अधिक कचरा’

क्षमतेपेक्षा अधिक कचरा साळगावच्या कचरा प्रकल्पात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची शक्यता आमदार लोबो यांनी यावेळी व्यक्त केली. सोनसोडो कचरा प्रकल्पातून आजच्या घडीस दरदिवशी चोवीस टन कचरा साळगाव प्रकल्पात येतो.

त्यामुळे सासष्टीतील कचऱ्याची तेथल्या तेथेच विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. साळगाव कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा लादण्याचा प्रयत्न झाल्यास स्थानिक लोक रस्त्यावर उतरणार असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

‘वारंवार त्याच चुकांची पुनरावृत्ती’

साळगावचे आमदार केदार नाईक म्हणाले, की सोनसोडोवरून साळगाव प्रकल्पस्थळी येणारे कचरावाहू ट्रक हे नियमांचे उल्लंघन करत आहेत. वाहतुकीवेळी या कचरावाहू ट्रकमधून दुर्गंधीयुक्त पाणी तसेच कचरा रस्त्यावर सांडतो.

मुळात लिचेट टाकीअभावी हे प्रकार घडत आहेत. वारंवार संबंधितांना आम्ही हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. तरीही त्याच चुकांची पुनरावृत्ती होते. विधानसभेत हा विषय मांडला होता. हा प्रकार न थांबविल्यास आम्हाला बाहेरून येणारे ट्रक रोखावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT