CM Pramod Sawant: पर्रीकर, बांदोडकर यांची स्मारके एकाच छताखाली

मुख्यमंत्री : वर्षभरात होणार नूतनीकरण : मिरामार येथे भाऊसाहेबांना आदरांजली
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे 50 वर्षांपूर्वी उभारलेले मिरामार येथील स्मारक हे स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्फूर्तिस्थळाप्रमाणेच विकसित करण्यात येणार असून या दोन्ही समाधी एकाच छताखाली आणण्याचा सरकारचा विचार आहे.

यासाठी साधनसुविधा विकास महामंडळाच्यावतीने निविदा जारी केल्या आहेत. या स्मारकाचे नूतनीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मिरामार येथे केली.

CM Pramod Sawant
Public Service Commission Recruitment: भरतीत गुणवत्तेशी तडजोड नाहीच, राज्याच्या हितासाठी गुणवानांची निवड

स्व. बांदोडकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भाऊसाहेबांच्या मिरामार येथील समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल आणि भाऊसाहेबांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारक नूतनीकरण कामाचे वरून भूमिपूजन करण्यात आले.

CM Pramod Sawant
ISKCON Project In Borim Goa: ...अखेर पोलिस बंदोबस्तात बोरी सरपंचांना पंचायतीबाहेर काढले; ग्रामस्थ आक्रमक

मुख्यमंत्री म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर स्मारकाच्या नूतनीकरणाचे आजपासून सुरू झालेले काम वर्षभरात पूर्ण होईल. यासाठी साधनसुविधा विकास महामंडळाकडून डिझाईन आणि इतर नूतनीकरणाच्या कामासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

भाऊसाहेबांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकार आणि भाऊसाहेबांच्या कुटुंबीयांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com