Goa Police: कळंगुट प्रकरणाने पोलिस दलाची मान झुकली, तरीही ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा का नाही?- मायकल लोबो

‘ते’ पोलिस उपमहानिरीक्षक गोव्याचे जावई आहेत का?
Lobo
Lobo Dainik Gomantak

Goa Police: किनारी भागात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून पर्यटक महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला जो निंदनीय आणि घृणास्पद आहे. असा प्रकार सामान्य माणसांकडून घडला असता, तर त्यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर नोंद करून कडक कारवाई झाली असती. इतकेच नव्हे, तर अशी व्यक्ती राजकीय वर्तुळातील असती, तर प्रसार माध्यमांनी त्याला नामोहरम करून सोडले असते.

मात्र, पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर असलेल्या त्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांत अद्याप रीतसर तक्रारसुद्धा दाखल झालेली नाही असे का? ती व्यक्ती गोव्याचा जावई आहे का?

असा संतापजनक सवाल कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी उपस्थित केला आहे. कळंगुट येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बारबाहेर थांबून दारुड्यांची तपासणी करण्याआधी पोलिस खात्याने सर्वप्रथम आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात (ज्यांनी दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग केला) रीतसर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी व एक चांगले उदाहरण घालून द्यावे, असे लोबो यांनी पुढे सांगितले.

कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यक्तीच जर चुकीच्या पद्धतीने वागू लागली, तर सर्वसामान्यांनी काय करावे? यापूर्वी याच आयपीएस अधिकाऱ्यांनी राज्यात इतरत्रही प्रताप केले आहेत. ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. मुळात या अधिकाऱ्यास इतके संरक्षण देण्यास ते गोव्याचे जावई आहेत का? अशी उपहासात्मक टीका करीत माध्यमांनी हा विषय उचलून धरावा, असे लोबो म्हणाले.

नुकतीच संपूर्ण पोलिस दलाची मान झुकवावी लागेल अशी लज्जास्पद घटना घडली आहे. बागा येथील पबमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने दारूच्या नशेत युवतीशी गैरवर्तणूक केल्याची घटना घडली होती.

याचा एक व्हिडिओ समोर आला. त्यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी डॉ. ए. कोअन यांना डीआयजी पदावरून हटविले होते. यावर लोबोंनी आपले मतप्रदर्शन करीत काही सवाल उपस्थित केले.

Lobo
ISKCON Project In Borim Goa: ...अखेर पोलिस बंदोबस्तात बोरी सरपंचांना पंचायतीबाहेर काढले; ग्रामस्थ आक्रमक

‘निलंबनाची कारवाई व्हायला हवी’

गोव्यात आल्यावर काहीही केल्यास चालते, हा गैरसमज दूर होण्याची आवश्यकता असल्याचे आमदार लोबो म्हणाले. डॉ. ए. कोअन यांनी केलेला हा एकमेव प्रकार नसून किनारी भागात त्यांच्याकडून यापूर्वी असे चुकीचे प्रकार घडल्याचा दावा लोबोंनी यावेळी केला.

त्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल होऊन कारवाई करणे, त्यांचे सेवेतून निलंबित होणे गरजेचे होते, असेही लोबो म्हणाले.

Lobo
CM Pramod Sawant: पर्रीकर, बांदोडकर यांची स्मारके एकाच छताखाली

‘कायद्यात दुरुस्ती करावी’

मद्यप्राशन करून वाहन हाकणाऱ्या विरोधात प्रखर कायदा हवा. मद्यसेवन करून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे अयोग्य आहे. अशावेळी विद्यमान कायद्यात दुरुस्ती करावी. जेणेकरून अशा प्रकारांवर आळा बसण्यास मदत मिळेल.

असे प्रकार पर्यटकांकडून जास्त प्रमाणात घडत असल्याचे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर लोबो म्हणाले की, पर्यटक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्यास त्यास भाड्याने टॅक्सी करण्याची सक्ती करावी. मात्र, एखाद्या बारबाहेर थांबून पोलिसांकडून चाचणी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com