Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: सत्तरीतील दुर्गम भागाशी जोडणाऱ्या साट्रे-पारवाड रस्त्याला गती द्या, ग्रामस्थांची मागणी

Goa News: पोर्तुगीज राजवटीतील हा रस्ता त्वरित सुरु करावा, अशी सत्तरीवासीयांची मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: साट्रे-पारवाड रस्ता खूपच उपयोगी असून या रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे. या रस्त्यामुळे सत्तरीतून कणकुंबी, बेळगावला जाणे सोयीचे होईल. पोर्तुगीज राजवटीत हा रस्ता सुरू होता, त्याकाळचा पूलसुद्धा आहे. तेव्हा हा रस्ता त्वरित सुरू करावा, अशी सत्तरीवासीयांची मागणी आहे.

नगरगाव पंचायत क्षेत्रातील साट्रे गावातून सीमाभागात पारवाड (कर्नाटक) येथे जाणारा जुना कच्चा रस्ता आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. त्यावर संबंधित पंचायती, सार्वजनिक बांधकाम खाते, मंत्र्यांनीही आश्‍वासन दिले आहे. परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली नाही.

गेल्या वर्षी 21 डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांशी आरोग्यमंत्र्यांनी पत्र व्यवहार करून केला होता. नगरगाव पंचायतीत गतवर्षी 2 ऑक्टोबरमध्ये ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला होता. पंचायतीने 30 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य मंत्र्यांनी रस्त्यासाठी निवेदन दिले होते. तसेच कर्नाटकच्या पारवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही 20 जुलै 2021 रोजी ठराव संमत केला होता.

एकूणच दोन्ही राज्यातील पंचायतीची मान्यता आहे. तेव्हा हा रस्ता होण्यासाठी राजकीय इच्छाशत्ती हवी. संबंधित खात्याने त्वरित हे काम सुरू करावे. मंत्री राणेसुद्धा या रस्त्यासाठी प्रयत्नशील आहे. तेव्हा हा रस्ता त्वरित करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

सत्तरी तालुका हा कर्नाटक राज्याशी जोडलेला तालुका आहे. पोर्तुगीज शासनावेळी लोक सत्तरीच्या जंगलातून कर्नाटकात म्हणजे कणकुंबी, पारवाड आदी गावात व्यापारासाठी जात होते. पोर्तुगीज सरकाराने त्याकाळी रस्ते, पुलांचीही बांधणी केली होती. आता अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करुन या ठिकाणी नवीन रस्ते बांधणे गरजेचे आहे.

शिवाय कर्नाटकच्या हद्दीतील रस्त्यासाठी कर्नाटक शासनाशीही पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील साट्रे गावातून कर्नाटकात पारवाड, कणकुंबी व तिथून बेळगावला जाता येते. साट्रे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. साट्रे परिसराच्या विकासासाठी शासनाने योजना आखणे गरजेचे आहे.

पोर्तुगीजकालीन रस्त्यांची बांधणी पुन्हा केल्यास, हा रस्ता वापरण्यास योग्य होईल. पुलांचीही बांधणी करायला हवी. हा अगदीच जवळचा रस्ता असल्याने वाहतुकीसाठी खूप उपयोगी रस्ता होईल, त्यासाठी सरकारने या रस्त्यांचे काम हाती घ्यावे, अशी साट्रेतील ग्रामस्थांची मागणी आहे.

म्हादई वनक्षेत्रातून रस्ता

साट्रेमार्गे रस्ता झाल्यास हे अंतर चाळीस पन्नास कि. मी.ने कमी होणार आहे. साट्रे गावातून कणकुंबी, पारवाड गावात पोचता येते. या साट्रे-पारवड रस्त्याचे सर्वेक्षण करून रस्त्याचे बांधकाम करावे, यासाठी नोव्हेंबर 2015 मध्ये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना नगरगाव पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते.

सदर रस्ता म्हादई वनक्षेत्रातून जातो. वन संरक्षण कायदा 1980 च्या कलम दोनचा अडथळा येत आहे. म्हणूनच त्या कलमांमध्ये बदल करुन अशा दुर्गम गावातील पूर्वापार असलेल्या रस्त्यांची बांधणी केली पाहिजे. मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात रस्त्याचे सर्वेक्षण केले होते. त्याकाळात काही प्रमाणात लोकांची ये-जा सुरू होती. पण नंतर रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक बंद झाली.

गोवा-बेळगाव सोयीचा रस्ता

नगरगावचे नागरिक सर्वेश न्हावेलकर म्हणाले, पोर्तुगीज राजवटीत साट्रेतून चालत ये-जा करीत होते. आता जर हा कच्चा रस्ता सरकारने पक्का केल्यास पारवड-नगरगाव गावे जोडली जातील. नवीन रस्त्यामुळे नगरगाव परिसराचाही विकास होईल. साट्रे-पारवड परिसरात तपासणी नाकाही उभा राहू शकतो. जवळचा रस्ता झाल्यास प्रवाशांनी गोवा-बेळगाव अंतर कमी होईल. एकूणच हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यामुळे वेळ व पैशाचीही बचत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT