Goa: 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार Dainik Gomantak
गोवा

Goa: 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

जयश्री शानभाग यांनी अनुवादित केलेल्या 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: पोर्तुगीज धर्मछळानंतर 1560 साली गोव्यातील 22 हजार कुटुंबे धर्म आणि देव रक्षणासाठी कर्नाटक आणि केरळ राज्यात परागंदा झाली. याच ऐतिहासिक घटनांवर आधारित मूळ गोपालकृष्ण पै यांच्या कन्नड भाषेतील 'स्वप्न सारस्वत' या कादंबरीच्या म्हैसूर स्थित कोकणी लेखिका जयश्री शानभाग यांनी केलेल्या कोंकणी अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

'स्वप्न सारस्वत' कादंबरी

साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून. सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. 50 हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो.

कोकणी, कन्नड, मराठी व हिंदी या चार भाषांत पारंगत असलेल्या जयश्री शानभाग या आकाशवाणीच्या निवृत्त अधिकारी असून त्यांनी आता पर्यंत वरील चारही भाषांत लिखाण व अनुवाद केला आहे. आकाशवाणीच्या पणजी, मंगळुरू, कोची व म्हैसूर या केंद्रांवर त्यांनी सेवा दिली असून एक लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख बनविली होती. आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल 27 वर्षे सेवा देत अनेक कार्यक्रम प्रसारित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

SCROLL FOR NEXT