Sagar Suresh Naik Mule and Narendra Modi 

Mann Ki Baat 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्याचे सागर सुरेश नाईक मुळे प्रधानमंत्र्यांच्या 'मन की बात'मध्ये झळकले

सागर यांनी कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. आज संपूर्ण राज्य त्यांचं कौतुक करत आहे.

Akash Umesh Khandke

गोव्याच्या फोंडा येथील आडपईचे सागर सुरेश नाईक मुळे हे लुप्त होत चाललेल्या कावि कला प्रकाराला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या धडपडीची दखल पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात घेतली आहे. त्यामुळे सध्या ते सर्वत्र चर्चेत आहेत.

Paintings 

"आज सकाळी मला पुणे (Pune) आकाशवाणी मधून फोन आला. तिथून बोलणारी व्यक्ती म्हणाली, आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तुमचा 'मन की बात' (Mann Ki Baat) मध्ये उल्लेख केला आहे. हे ऐकून मी स्तब्ध झालो. पुढे काय बोलावे हे मला कळेना. मी त्यांना हो म्हणून फोन ठेवला. उठून बघतो तर गावात सर्वत्र माझीच चर्चा सुरू होती. एक कलाकार म्हणून हे मला मिळालेले सर्वात मोठे पारितोषिक आहे, हे उद्गार आहेत सागर सुरेश नाईक मुळे यांचे.

सागर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. याच आवडीला उदरनिर्वाहाचं साधन बनवण्यासाठी त्यांनी 2013 मध्ये गोवा (Goa) कॉलेज ऑफ आर्टस् मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी हैदराबाद येथील कॉलेजमध्ये नाव नोंदवले. शिक्षण पूर्ण करून ते गोव्याला परतले.

दुसऱ्यांसाठी नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा मुर्त्या बनवण्याचा लघुउद्योग सुरु केला. हातात कला होती, मात्र मुर्त्या बनवून पोट भरत नव्हते. आर्थिक नड भागवण्यासाठी त्यांनी चित्रकला व छायाचित्रण सुरू केले. या नवीन प्रवासात देखील ते चमकले. त्यांना चित्रकला व छायाचित्रणासाठी आतापर्यंत 5 गोवा राज्य पुरस्कारांसह अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या चित्रात गावातील सौंदर्याचे वर्णन असते. त्यांना गोव्याच्या कावि कला प्रकाराने आकर्षित केले. कावि म्हणजे लाल माती. प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर या चित्रकलेचा वापर करून चित्रे रेखाटली जायची.

दरम्यान, कोरोनाकाळात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यात आईचे आजारपण सुरू झाले. यामुळे सागर मानसिकरित्या खलचे. पण ते थांबले नाहीत. या काळातच त्यांनी नवरात्रीच्या दरम्यान, नव देवीचे कावि कला प्रकाराचा उपयोग करून चित्र रेखाटली. या चित्रांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. ते प्रकाश झोतात आले. पुढे त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे रेखाटली.

Paintings 

सागर यांनी कधीही मागे वळून पाहिलेले नाही. आज संपूर्ण राज्य त्यांचं कौतुक करत आहे. "सागर सुरेश नाईक मुळे हे लुप्त होत चाललेल्या कावि कला प्रकाराला जिवंत ठेवत आहेत," असे मन की बातमध्ये मोदी म्हणाले.

"काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या पत्रकारांनी माझ्याशी संपर्क साधला. माझी माहिती घेतली. कावि कला प्रकाराबद्दल मला प्रश्न विचारले, पण मला याची अजिबात कल्पना नव्हती की प्रधानमंत्री (Prime Minister) माझा मन की बात मध्ये उल्लेख करतील. माझं कौतुक करतील," असे सागर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT