वत्सला कीर्तनी 18 जूनची खरी नायिका

1940 च्या दशकात गोव्यात किंवा देशातील इतर भागातही महिलांनी समाजासमोरील आव्हाने स्वीकारणे आणि त्यातल्या त्यात राजकारणात भाग घेणे सामान्य नव्हते.
Vatsala Kirtani is the real heroine of 18th June

Vatsala Kirtani is the real heroine of 18th June

Dainik Gomantak

वत्सला कीर्तनी यांच्या 18 जूनच्या चळवळीतल्या संक्षिप्त पण प्रेरणादायी भूमिकेने आजच्या काळातील विद्यार्थिनींमध्ये क्रांतिकारी उत्साह निर्माण व्हायला हवा. 8 मे 1924 रोजी मडगाव येथे जन्मलेल्या या तरुणीबद्दल फारसे काही बोलले जात नाही किंवा त्यांच्याबद्दल अधिक काही लिहिलेलेही उपलब्ध नाही. परंतू 1946 मध्ये सालाझारवादी हुकूमशाहीला आव्हान देण्याचे धैर्य त्यांनी दाखविले.

1940 च्या दशकात गोव्यात (Goa) किंवा देशातील इतर भागातही महिलांनी समाजासमोरील आव्हाने स्वीकारणे आणि त्यातल्या त्यात राजकारणात भाग घेणे सामान्य नव्हते. त्यामुळे सालाझार यांनी निर्बंधित केलेले नागरी हक्क परत मिळविण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात कु. वत्सला कीर्तनी यांनी बजावलेली भूमिका प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे. त्या काळात तथाकथित महिला पक्ष अथवा दल अशा कोणत्याही संकल्पना प्रचलित नव्हत्या. परंतु गोव्यातील वत्सला कीर्तनी सारख्या 1940 च्या दशकातील साध्या आणि नम्र स्त्रिया होत्या, ज्यांनी नंतरच्या अनेक स्त्रियांचा त्यांच्या घरातील "राजांगणा" च्या चौकटीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा केला.

<div class="paragraphs"><p>Vatsala Kirtani is the real heroine of 18th June</p></div>
पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये सलमान खानला चावला साप

मडगावात (Margao) त्या ऐतिहासिक दिवशी जेव्हा कु. कीर्तनी यांना अटक झाली तेव्हा त्यांनी तुरूंगाबाहेर येण्यास ठाम नकार दिला आणि त्यांना अक्षरशः ढकलून बाहेर काढावे लागले. 18 जून या विषयावरील माझ्या इतिहास व्याख्यानाच्या तयारीसाठी 1993 मध्ये दिवंगत पुरुषोत्तम काकोडकर यांची मी पणजी येथील मगनलाल सदन या त्यांच्या निवासस्थानी मुलाखत घेतली होती. आणि त्या दिवशी वत्सला कीर्तनी यांनी 18 जून रोजी दाखविलेल्या धाडसाचे त्यांनी तोंडभर कौतुक केले. 18 जूनचा ऐतिहासिक दिवस त्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. वत्सला कीर्तनींच्या धाडसाचे ते साक्षीदार होते.

पण इतिहासाच्या पुस्तकांनी स्वातंत्र्यलढ्यातील वत्सलांच्या भूमिकेकडे डोळेझाक केली आहे. परंतू मडगाव येथील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शिक्षिका कु. वत्सला कीर्तनी आणि ऐतिहासिक चळवळीतील त्यांच्या भूमिकेची आठवण करून देतात. वत्सला कीर्तनी या मडगाव येथे स्थापन झालेल्या गोवा सेवा संघाच्या प्रमुख सदस्य होत्या. या संघाचे राजकीय हेतू गुप्त ठेवण्यात आले होते पण त्यांचे सामाजिक कार्य मात्र उघडपणे केले जायचे. गोवा सेवा संघाच्या सर्व कार्यक्रमात वत्सला कीर्तनी सहभागी झाल्या होत्या. मडगावातील प्रमिलाबाई जांबावलीकर यांच्या घरी या संघाच्या बैठका व्हायच्या. खादीची गांधीवादी विचारसरणी मडगावच्या राष्ट्रवादी महिलांना बांधून ठेवण्यासाठी अवलंबिली होती आणि अखेरीस 18 जून 1946 च्या मडगावच्या आंदोलनात त्या स्त्रियांनी अनुकरणीय आणि उल्लेखनीय धैर्य दाखविले. डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या अटकेनंतर तेथे जमलेल्या इतर कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्तपणे असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्या क्षणी वत्सला कीर्तनी पुढे आल्या आणि त्यांनी "जय हिंद" ची राष्ट्रवादी घोषणा देण्यास सुरूवात केली.

पोर्तुगीजांच्या मते ही अत्यंत निंदनीय आणि प्रचंड निषिद्ध अशी गोष्ट होती. पोर्तुगीज कमांडंट कॅप्टन फिग्युरिदो याने वत्सला कीर्तनी यांची बरीच खरडपट्टी काढली, परंतु वत्सला यांनी त्याला न जुमानता उलट उत्तर दिले, “जर व्हिवा सालाझार ही घोषणा ही तुम्हांला अभिमान देते, तर जय हिंद ही घोषणा मला मुक्तीसाठी लढण्याची ताकद देते.” असा उल्लेख राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालयाने प्रकाशित केलेल्या "हूज हू ऑफ फ्रीडम फायटर्स" या पुस्तकातील वत्सला कीर्तनी यांच्या संक्षिप्त चरित्रात्मक नोंदीत आढळून येतो. यानंतर त्यांना तत्काळ अटक करून त्यांची रवानगी मडगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. गोवा सेवा संघातील त्यांच्या सहकारी प्रमिलाबाई जांबावलीकर यांनी श्रीमती वत्सला कीर्तनी यांची तात्काळ सुटका करावी या मागणीस्तव मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या मोर्चात मडगाव येथील कित्येक तरूण स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. मुक्ता आणि जीवन या कारापूरकर भगिनी, ललिता कंटक (वेलिंगकर), शारदा पाणंदीकर (कामत), विमल वागळे, कृष्णा आणि विठा हेगडे, रतन देसाई, उमाबाई शिराळे, इंदिरा भिसे अशा इतर अनेक स्त्रियांचा त्यात समावेश होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे वत्सला कीर्तनी यांनी तुरूंगातून बाहेर येण्यास नकार दिला आणि त्यांना अक्षरशः बाहेर ढकलून द्यावे लागले. त्या ऐतिहासिक दिवशी वत्सला किर्तनी यांनी इतिहास घडवला.

वैयक्तिक नोंदीनुसार, त्यांनी विवाह केला नाही आणि गोवा आणि मुंबईतील शाळांमध्ये हिंदी शिकवत आपल्या कुटुंबाची कायम खूप काळजी घेतली. 16 नोव्हेंबर 1971 रोजी वयाच्या 46 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण एसएससीपर्यंत झाले होते आणि त्यांना हिंदी विषयात पांडित्य प्राप्त झाले होते. पोर्तुगीज कमांडंट कॅप्टन फिग्युरिदो याला न जुमानता वत्सला कीर्तनी यानी निर्भयपणे उलट उत्तर दिले, “जर व्हिवा सालाझार ही घोषणा तुम्हांला अभिमान देते, तर जय हिंद ही घोषणा मला मुक्तीसाठी लढण्याची ताकद देते.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com