गोव्यातील स्थळांचे नाम विकृतीकरण

गोव्याच्या (Goa) विविध शहरांची हिंदी नावे त्याचप्रमाणे आहेत, जशी कोंकणी व मराठीमध्ये आहेत.
गोव्यातील स्थळांचे नाम विकृतीकरण

गोव्यातील स्थळांचे नाम विकृतीकरण

Dainik Gomantak

गोव्यात (Goa) विविध रस्त्यांवर (Road) शहरांच्या हिंदी नावांचे फलक आपण पाहिलेलेच असणार. त्याच बरोबर गोव्यात एखादी महत्वाची घटना घडली व चुकून कधी ती राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात आली तर तेंव्हासुद्धा गोव्याची नावे हिंदीमध्ये विचित्रपणे लिहिली जातात. गोव्यात प्रकाशित होत असलेल्या हिंदीच्या वर्तमानपत्रामध्येसुद्धा (Newspaper) हेच घडते. हे सर्व प्रकरण काय ते आज आपण बघू.

सर्रास चुकीची लिहिली जाणारी गोव्यातील (Goa) शहरांची नावे अशा प्रकारे आहेत - परनेम, पंजिम, डोना पौला, बमबोलिम, बैंगुनियम, करंबोलिम, संकुएलिम, मरसेला, कवलेम, धावली, मैना कर्टोरिम, कर्टोलिम, रासईम, बेतालबेतीम, फटोरडा, डिचोलिम, धारभंदोरा, करकोरम, क्वुपेम, सेलावलिम, सांगेम, उगेम, कनकोना, मापुका, मरसाईम, रासईम, लौटोलिम इत्यादी. काही जण तर 'गोवा' ऐवजी 'गोआ' सुद्धा लिहितात. आता मुख्य प्रश्न हा की ही नावे अशा प्रकारे का लिहिली जातात? याचे प्रमुख कारण हे की या नावांचे इंग्रजी स्पेलिंग घेऊन त्यांचा मशिनी किंवा गुगल अनुवादकाच्या मदतीने अनुवाद केला जातो. 18 मे 2017 ला सावर्डे-कुडचडे येथील जुन्या पुलाचा फुटपाथ कोसळला होता. तेंव्हा सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवर बातमी आली – ‘गोवा के करकोरम में पुल गिरा।’ काही लोकांनी तर मला मॅसेज करून विचारले की ही 'करकरोम' नावाची जागा आहे तरी कुठे? त्यांनी Curchorem या स्पेलिंगचा मशिनी अनुवाद केला होता. डॉ. प्रमोद सावंतनी मुख्यमंत्रीपदाची (CM Pramod Sawant) शपथ घेतली तेंव्हा लिहिले होते – ‘प्रमोद सावंत गोवा के 'संकुएलिम' से विधायक हैं।’ परत ‘सांखळीम’च्या स्पेलिंगचा अनुवाद.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील स्थळांचे नाम विकृतीकरण</p></div>
मडगावचे दोन नगरसेवक तृणमुलमध्ये दाखल

गोव्याच्या विविध शहरांची हिंदी नावे त्याचप्रमाणे आहेत, जशी कोंकणी व मराठीमध्ये आहेत. हिंदी नियम काही वेगळा नाही. उच्चारणाप्रमाणे थोडे स्पेलिंग बदलावे लागणार पण इतके भलते-सलते विकृतीकरण अगदीच बरोबर नाही. काही लोकांना स्वतःच माहीत नसते. मग ते म्हणतात कि हिंदीमध्ये असेच लिहितात पण उच्चारण तसे करतात. हे असले स्पष्टीकरण देऊन सांगून ते अकलेचे तारे तोडतात. ही सर्व नावे ‘मशीनी’ अनुवादामुळे झाली आहेत व डोळे मिटून फलक लावलेले आहेत. हिंदीमध्ये ‘ळ’ व्यंजन नाही, पण व्यक्तीवाचक (स्थानवाचक) संज्ञामध्ये ते वापरायलाच हवे अन्यथा अर्थाचा अनर्थ होणार. कुळेचे ‘कुले’ सुद्धा करून ठेवलेय.

आता जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसा भाषांचा खून अधिकच व्हायला लागलाय. ‘खून’ झालेली ही भाषा अंतिम श्वास घेत आहे. आधीच आम्हाला ‘गोनीची सकाळ’, ‘दसन्याची परबी’ मिळालेली आहे. 19 डिसंेबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाबोळी विमानतळावर उतरले व हॅलीकॉप्टरने गोवा विद्यापीठाच्या हॅलीपॅडवर उतरले. गोव्याबाहेरील वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रात ‘पणजी एयरपोर्टवर उतरले' असे लिहिण्यात आले होते. मोदींनी नावे व्यवस्थित घेतली नाहीत. त्यांना उच्चारण जमणार नाही हे सत्य पण ‘अ’, ‘आ’ हे ध्वनी तरी नीट म्हणता येतात ना? जसे, 'श्रीपद' नाईक नव्हे, 'श्रीपाद' नाईक, 'प' ऐवजी 'पा' म्हणायला जमणारच की त्यांना! पण कुणी सांगितले तर ना! 'पारिकरला' आता ते 'परींकर' म्हणू लागलेत. 'आजगावकर' जमणार नाही कारण त्यातील कोंकणी 'ज' चे उच्चारण उर्दूच्या 'ज़' प्रमाणे आहे. पण ‘कावलेकर’, ‘लवांडे’, ‘आगौड़ा’ ही नावे खपवून घेता येणार नाही. मागच्या वेळी मोदींनी म्हटलंय, 'जुरी ब्रिज मार्गों को पंजी से जोड़ता है!' आता हे काय? विश्वनेते मोदीजी असे म्हणतात म्हणून सर्वजण त्यांचे ऐकून हेच म्हणायला लागतील. यात मोदींची काहीच चूक नाही. त्यांना लिहून देणारा खराच बिनडोक्याचा! आता 'गोंयकारांनो' लिहिले होते की 'गोयंकारोना' ते पहावं लागेल.

उदाहरणे खूप आहेत.

काही सोमवारच्या अंकात.

-आदित्य सिनाय भांगी

रोहित शेट्टी यांच्या कृपेमुळे तर गोवा 'सिटी' सुद्धा झालीय. काही टॅलिकॉम सर्कलवाले ‘गोवा’ हे राज्य दाखवतच नाहीत. ते महाराष्ट्रात दक्षिण गोवा आहे असे दाखवतात: महाराष्ट्र व गोवा हे टॅलिकॉम सर्कल असूनसुद्धा. नोकिया केअर सेंटरमधून एकदा तर मला विचारले, तुम्ही कुठल्या राज्यातून बोलताय? ‘गोवा’ असे उत्तर दिल्यावर ते म्हणाले, सर तुम्ही समजला नाहीत, ‘गोवा’ हे शहर आहे. मुंबई, पुणे ही शहरे महाराष्ट्र या राज्यात आहेत, बंगळुरू, म्हैसूर शहरे कर्नाटक राज्यात आहेत, तसे ‘गोवा’ शहर महाराष्ट्र राज्यात आहे की कर्नाटक राज्यात? म्हणजे बघा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com