फोंडा/कुडचडे/वास्को: राज्यात बुधवार, १ रोजी चार वेगवेगळ्या अपघातांत चार जणांना प्राण गमवावे लागले तर पाचजण गंभीर जखमी होण्याचे प्रकार घडले. या अपघातांमुळे बुधवार हा घातवार ठरला. रामनगर-गोवा मार्गावरील तिनईघाटजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादहून गोव्याला निघालेल्या विजयानंद या खासगी प्रवासी बसने मँगनीजने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पोचालक राजशेखर बोडनमारी (ता. चिंतामणी, जिल्हाः चिक्कबल्लापूर) याचा जागीच मृत्यू झाला.
तर विजयानंद बसमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर एक दुचाकीस्वारही जखमी झाला असून तो खानापूर तालुका चापगाव येथील असून किरण पाटील असे त्याचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपासणी सुरू आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत. दरम्यान, कुडचडे येथे मंगळवारी उत्तररात्री १२.२० वा. काकोडा येथील माधेगाळ येथील लिंबलो गॅरेजजवळ केटीएम २०० ड्यूक आणि आय२०मध्ये समोरासमोर टक्कर झाली यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती. चारचाकी कुडचडे तर दुचाकी सांगे बाजूला जात होती. ही दोन्ही वाहने काकोडा येथे पोहोचली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने केटीएम दुचाकी चालवणारा प्रसाद चंद्रकांत नाईक (२५, वालशे-सांगे) याचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. कुडचडे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
मुरगावात दोन ठार
आज बुधवारी सांकवाळ अपघातात टँकरने धडक दिल्याने टैंकरखाली चिरडून दुचाकीच्या मागे बसलेले मधुकर परब (७०) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एका अपघातात सडा-वास्कोकडे जाणाऱ्या मोटरसायकलची विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटरला समोरासमोर धडक बसली. यात मागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि नंतर जीएमसीमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.