Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: 'स्पीड गव्हर्नर' सक्तीचेच! प्रशासनाकडून महिनाभराची मुदत जारी

Goa Road Accident: टॅक्सी, रेंट अ कारसह सर्व सार्वजनिक वाहनांना 'स्पीड गव्हर्नर' अनिवार्य करण्यात आला

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सर्वश्रुत आहे. सर्व अपघातांमागील कारणे शोधल्यास वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक खाते अधिक सक्रिय झाले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना जरब बसविण्यासाठी मालवाहू वाहनांसह ‘रेंट ए कॅब’ना स्पीड गव्हर्नरची सक्ती करण्यात आली असून केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 नियम 118 नुसार प्रत्येक वाहनाला स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकार स्पीड गव्हर्नरबाबत गंभीर बनले असून वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या संबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

टॅक्सी, रेंट अ कारसह सर्व सार्वजनिक वाहनांना 'स्पीड गव्हर्नर' अनिवार्य करण्यात आला असून 'स्पीड गव्हर्नर' बसविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

यासाठी टॅक्सी चालकांना कुठल्याही ठिकाणांवरून स्पीड गव्हर्नर खरेदी करण्याची मुभा देण्यात अली आहे. मात्र 07 एप्रिल नंतर ज्या गाड्यांना स्पीड गव्हर्नर नसतील त्यांचावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाला स्पीड गव्हर्नर बसविणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक टॅक्सीचालक वाहतूक खात्याचे फिटनेस प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण होईपर्यंत स्पीड गव्हर्नर बसवितात आणि नंतर ते बंद करतात असेही दिसून आले आहे.

मात्र आता सरकारने वाढत्या अपघातांमुळे कडक पाऊले उचलली असल्याने नियमबाह्य कृती करणारे टॅक्सीचालक कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

मांडवी पुलावर रेंट ए कॅबने धडक दिल्याने दुचाकी चालक नदीत कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासावेळी कॅब चालकाने मद्य प्राशन केल्याचे समोर आले होते आणि यानंतरच रेंट ए कॅबना स्पीड गव्हर्नर बसविण्याच्या मागणीने जोर धरला.

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी देखील याप्रकरणी रेंट कॅबवरती मालकांकडून चालकाची नेमणूक केली जावी अशी मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT