Goa Accident Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: चिंताजनक! गोव्यात 715 अपघाती मृत्यू; हेल्मेट न वापरल्यामुळे सर्वाधिक दुर्घटना

Goa Accident Death Statitics: वाहतूक पोलिस खात्‍यात सध्‍या ३७२ पोलिसांची कमतरता असल्‍याचे सांगत, कुठे किती पोलिस रिक्त आहेत? याची माहितीही सादर केलेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गेल्‍या पाच वर्षांच्‍या काळात हेल्‍मेट परिधान न केलेल्‍या ६५२, तर दारूच्‍या नशेत वाहन चालवणाऱ्या ६३ अशा एकूण ७१५ जणांना अपघातांत जीव गमावावा लागल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. २०२१ पासून आतापर्यंत हेल्‍मेट परिधान न करता दुचाकी चालवताना किती चालकांचा जीव गेला? दारूच्‍या नशेत वाहन चालवणाऱ्या किती जणांनी जीव गमावला? असे प्रश्‍‍न आलेमाव यांनी विचारले होते. त्‍

यावरील उत्तरातून मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्‍यातून २०२१ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत दुचाकी चालवताना हेल्‍मेट परिधान न केलेल्‍या उत्तर गोव्‍यातील ३२९ आणि दक्षिण गोव्‍यातील ३२३ असे मिळून ६५२ जणांचा मृत्‍यू झाला.

३७२ पोलिसांची कमतरता

वाहतूक पोलिस खात्‍यांत पोलिसांची कमतरता आहे का? असाही प्रश्‍‍न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला होता. त्‍यावर वाहतूक पोलिस खात्‍यात सध्‍या ३७२ पोलिसांची कमतरता असल्‍याचे सांगत, कुठे किती पोलिस रिक्त आहेत? याची माहितीही सादर केलेली आहे.

दारूच्‍या नशेत जीव गमावलेले

वर्ष उत्तर गोवा दक्षिण गोवा

२०२१ १ ०

२०२२ ३१ १

२०२३ ६ ४

२०२४ १३ १

२०२५ ३ २

२०२६ ० १

(३१ जानेवारीपर्यंत)

एकूण ५४ ९

हेल्‍मेट नसल्‍याने जीव गमावलेले

वर्ष उत्तर गोवा दक्षिण गोवा

२०२१ ५५ ५३

२०२२ ५० ७३

२०२३ ७५ ६९

२०२४ ६९ ६४

२०२५ ७२ ६०

२०२६ ८ ४

(३१ जानेवारीपर्यंत)

एकूण ३२९ ३२३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT