Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रस्‍ता चुकला, घात झाला; अपघातात दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू, कारची दुचाकीला धडक, बांबोळीतील घटना

Goa Bambolim accident: भीषण अपघातात साल्वादोर फर्नांडिस (८०) आणि पाऊलिना फर्नांडिस (७५, रा. साल्‍वादोर-द-मुंद, पर्वरी) या दाम्‍पत्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमजवळ सोमवारी पहाटे साडेचारच्‍या सुमारास झालेल्या भीषण अपघातात साल्वादोर फर्नांडिस (८०) आणि पाऊलिना फर्नांडिस (७५, रा. साल्‍वादोर-द-मुंद, पर्वरी) या दाम्‍पत्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, साल्वादोर आणि पाऊलिना हे दाम्पत्य पहाटे पर्वरी येथून गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयात दुचाकीवरून जायला निघाले. गोमेकॉजवळ पोहोचले असता ते रस्‍ता चुकले आणि मार्गावरून थेट पुढे ॲथलेटिक स्‍टेडियमजवळ पोहोचले. मागे फिरण्‍यासाठी त्‍यांनी आपली दुचाकी चुकीच्या दिशेने वळविली आणि त्‍याचवेळी भरधाव वेगाने पणजीहून मडगावच्‍या दिशेने जाणाऱ्या कारची त्‍यांना धडक बसली.

हा अपघात एवढा भीषण होता की दोघेही रस्‍त्‍यावर फेकले गेले. दुचाकीचा तर अक्षरश: चुराडा झाला. कारच्‍या दर्शनी भागाचेही मोेठे नुकसान झाले. गंभीर अवस्‍थेत फर्नांडिस दाम्‍पत्‍याला तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचीही प्राणज्‍योत मालवली.

आयुष्याची ऐंशी आणि पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही एकमेकांची साथ देत जगणाऱ्या या दाम्पत्याचा प्रवास एका क्षणात संपुष्टात आला. घराकडे सुखरूप परतण्याची त्यांची इच्छा नियतीने हिरावून घेतली. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आगशी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताची नेमकी कारणे आणि कारचालकाची जबाबदारी याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.

वाहतूक पोलिसांचे कळकळीचे आवाहन

वेगापेक्षा सुरक्षेला प्राधान्य द्या. घरी आपली माणसे वाट पाहत असतात, याचे भान ठेवा. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन आणि योग्य दिशेची खात्री करा, असे कळकळीचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

अन् जीवनप्रवास थांबला

पर्वरीहून गोमेकॉकडे जात असताना रस्ता चुकल्याचा अंदाज आल्याने या ज्‍येष्‍ठ दाम्पत्याने दुचाकी चुकीच्या दिशेने वळविली. त्याचवेळी भरधाव आलेल्या कारची त्‍यांना धडक बसली. त्‍यात दोघांचाही मृत्‍यू झाला.

ऐंशी-पंचाहत्तरीतही एकमेकांची साथ

साल्वादोर फर्नांडिस आणि पाऊलिना फर्नांडिस हे दाम्पत्य अनेक वर्षे सुख-दुःखात एकमेकांचे साथीदार होते. आयुष्याच्या उत्तरार्धातही ते एकत्र प्रवास करत होते; मात्र नियतीने त्यांचा अखेरचा प्रवासही एकत्रच ठरविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT