Road Accident Dainik Gomantak
गोवा

Road Accident: ‘रेंट-ए-कार’ने दुचाकीस्वारास ठोकले, राज्यात अपघातांचे सत्र सुरूच

आगशी येथे अपघात: पणजीतील दुचाकीचालक जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Road Accident राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून ते काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. यात रेंट – ए – कार आणि रेंट – ए – बाईक यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याची प्रचिती आज आगशी बगलमार्गावर आली.

भरधाव येणाऱ्या रेंट – ए – कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक वीरेश सिलीमखान (पणजी) हा जखमी झाला आहे. आगशी पोलिसांनी वाहनचालक हेमंत यादव (दिल्ली) याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

हा अपघात आज सकाळी ८.३० वा. झाला. वेर्णा येथे कामावर जात असलेल्या वीरेश सिलीमखानच्या दुचाकीला मागून येणाऱ्या रेंट – ए – कारने (क्र. जीए - ०८ - व्ही - २६९८) जोरदार धडक दिल्यानंतर तो उसळून खाली पडला. सिलीमखानला पायाला आणि हाताला दुखापत झाली

असून त्याला १०८ रुग्णवाहिकेत उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रेंट-अ-कारचे वाहनचालक हेमंत यादव याची मद्यपानासंबंधीची वैद्यकीय चाचणी केली आहे.

पोलिसांनी यादवला ताब्यात घेतले असून भादंसच्या कलम २७९ आणि २३८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मद्यपान केले की नाही याचा चाचणी अहवाल पाच ते सहा दिवसांत येणार आहे, अशी माहिती आगशी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांनी दिली.

महिलेचा जमावाबरोबर वाद

रेंट – ए - कारमधील चालक आणि महिलेने अपघातानंतर जमा झालेल्या जमावासोबत वाद घातला. चालक मद्यधुंद असल्याची संशय स्थानिकांना आल्यानंतर हा वाद सुरू झाला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव घटनास्थळी जमा झाला, त्यानंतर कारमधील महिलेने जमावाशी वाद घालण्यास सुरवात केली.

घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. अपघातानंतर महिलेने स्थानिकांशी वाद घातला तसेच, त्यांनाच दोष दिला. यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या पुरुषाने तिला सांभाळत माघारी नेत असताना व्हिडियोत दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT