Goa River Marathon: Dainik Gomantak
गोवा

Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉन डिसेंबरमध्ये; रविवारी जागृतीनिमित्त वेर्णा येथे ‘प्रोमो रन’

वास्को स्पोर्टस क्लबच्या गोवा रिव्हर मॅरेथॉनचे यंदा तेरावी आवृती असेल.

किशोर पेटकर

Goa River Marathon: वास्को स्पोर्टस क्लबच्या गोवा रिव्हर मॅरेथॉनचे यंदा तेरावी आवृती असेल. येत्या 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या या शर्यतीत जे 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करू शकत नाही, पण जास्त अंतर धावण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी 32 किलोमीटरची ‘द 20 मायलर’ शर्यत प्रथमच घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत क्लबचे अध्यक्ष नितीन बांदेकर यांनी दिली.

गोवा रिव्हर मॅरेथॉनला अजून सहा महिन्यांचा कालावधी असला, तरी आतापासून त्याविषयी जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. 18) वेर्णा औद्योगिक वसाहतीत वेर्णा उद्योग संघटना आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळ (जीआयडीसी) यांच्या सहकार्याने सकाळी सहा वाजता ‘प्रोमो रन’ घेण्यात येईल आणि त्यात राज्यभरातील सुमारे एक हजार हौशी धावपटू भाग घेतील, असे बांदेकर यांनी नमूद केले.

10 किलोमीटरची ‘कॉर्पोरेट चॅलेंज’ शर्यतही यंदा प्रथमच होईल. ‘द 20 मायलर’ शर्यत देशातील मोजक्याच मॅरेथॉनमध्ये असते, आता त्यात गोवा रिव्हर मॅरेथॉनची भर पडेल, असे बांदेकर म्हणाले. शर्यतीत देशातील, तसेच विदेशातील धावपटूही भाग घेतील.

पत्रकार परिषदेस गोवा रिव्हर मॅरेथॉन सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कृत करणाऱ्या एसकेएफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर, वास्को क्लबचे सचिव राकेश उन्नी, खजिनदार अभिजित साळकर यांची उपस्थिती होती.

यावर्षीची गोवा रिव्हर मॅरेथॉन

- सुरवात चिखली-वास्को येथे 19 डिसेंबर रोजी

- 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन, 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन

- 32 किलोमीटर ‘द 20 मायलर’, 10 किलोमीटर ‘कॉर्पोरेट चॅलेंज’

- 5 किलोमीटर शालेय संघांसाठी, 5 किलोमीटर ‘फन वॉक-रन’ नवोदितांसाठी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT