मार्केट कॉम्प्लेक्सवरील मोबाईल टॉवरचा प्रस्ताव फेटाळला; मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा

बैठकीत आयओसी, गोवा सहकार भंडार यांच्या थकबाकीच्या विषयासह विविध विषय या चर्चेत गाजले.
Mormugao
Mormugao Dainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao Muncipal Council: मुरगाव पालिका मंडळाची शुक्रवारी (दि.16) झालेली बैठक विविध मुद्यावरून गाजली. गेल्या बैठकीत मांडलेले विषय मिनिटस् बुकमध्ये नमुद न करता भलतेच विषय बूकमध्ये मांडल्याचा आरोप करत नगरसेवक यतिन कामूर्लेकर व फेड्रीक हॅन्ड्रीक्स यांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीत मार्केट कॉम्प्लेक्सवर मोबाईल टॉवर बसविण्याचा प्रस्ताव सध्या फेटाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच आयओसी, गोवा सहकार भंडार यांच्या थकबाकीच्या विषयासह विविध विषय या चर्चेत गाजले.

पालिका मंडळाची बैठक पालिका कर्मचारी मिल्टन डिसोझा यांनी पालिकेत केलेल्या घोटाळ्यावरुन सुरु झाली. त्याच्यावर आजपर्यन्त कोणतीच कारवाई का झाली नाही या विषयी नगरसेवकांनी पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारला. तर, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे उत्तर नगराध्यक्षांनी दिले.

आयओसीच्या विषयात, सदर कंपनी आर व्ही एनकॉय या कंपनीला चालवायला दिली आहे. याच्यावर नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स व यतिन कामुर्लेकर यांनी आक्षेप घेतला. सध्या आयओसी पालिका लीजवर असताना ती कंपनी दुसऱ्या कंपनीला ताबा देऊ शकत नसल्याचे नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले. तसेच त्यांना पालिकेकडून परवाना देऊ नये असा सल्ला दिला.

Mormugao
रहस्यमय! 112 वर्षानंतर दोना पावला येथील ब्रिटीश स्मशानभूमीत दफन झाला मृतदेह; तक्रार दाखल, तपास सुरू

गोवा सहकार भंडार पालिकेला करोड़ो रुपये थकबाकी देणे आहे. ते भाडेही वेळेवर दिले जात नाही त्यामुळे व्याज वाढत जाते. महिन्याला 75 हजार भाडे भरायचे सोडून फक्त पाच हजार रुपयांचा धनादेश पालिकेला भाडे म्हणून देत पालिकेला भाडे योग्य देत नाही.

याविषयी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी लक्ष घालावे अशी मागणी नगरसेवकांनी केली. गोवा सहकार भंडारकडून भाडे आणि व्याज माफ करण्याच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली.

तसेच, नवीन मार्केट कॉम्प्लेक्सवर मोबाईल टॉवर बसविण्याचा प्रस्ताव असून तो स्वीकारण्यात आलेला नसून याविषयी पुढील बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com