Goa River Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यातील नद्यांची पातळी वाढली, सत्तरी तालुक्‍याला पुराची भीती; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Goa River Flood: पावसाने पुन्‍हा जोर धरला असून बुधवारी दिवसभर राज्‍याला झोडपून काढले. त्‍यामुळे रस्‍ते पाण्‍याखाली गेले. अनेक ठिकाणी पडझड झाली.

Sameer Amunekar

पणजी/डिचोली/वाळपई : पावसाने पुन्‍हा जोर धरला असून बुधवारी दिवसभर राज्‍याला झोडपून काढले. त्‍यामुळे रस्‍ते पाण्‍याखाली गेले. अनेक ठिकाणी पडझड झाली. डिचोलीतील नदीसह सत्तरीतील वेळूस, म्हादई, रगाडासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्‍यामुळे नदीच्‍या काठावर राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. राजधानी पणजीतील पाटो परिसर नेहमीप्रमाणे पाण्‍याखाली गेला. आमोणे (डिचोली) परिसरात दोन घरांवर झाड पडून नुकसान झाले. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पात्र धोक्‍याची पातळी ओलांडण्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. दरम्‍यान, पावसामुळे आज डिचोलीचा आठवडी बाजार थंडावला.

सत्तरी तालुक्‍याला पुराची भीती

सत्तरी तालुक्यात काल रात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांची पातळी वाढली आहे. रात्रभर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नद्यांच्या काठावरील काही भागात पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोपार्डे, वेळूस परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाळपई शहरातील नाल्यांची पातळी वाढत असून मासोर्डे येथील बांध परिसरात पूरसदृश स्‍थिती निर्माण झाली आहे.

‘तिळारी’तून जलविसर्गाचा धोका

पावसाचा रुद्रावतार धारण केल्‍यामुळे महाराष्ट्रातील तिळारी धरणातील जलसाठा अचानक वाढू लागला आहे. पुढील २४ तास पावसाचा कहर सुरूच राहिला तर कदाचित तिळारीतून जलविसर्ग होण्याचा धोका आहे. तशी शक्यता गृहीत धरून महाराष्ट्रातील पाटबंधारे खाते सतर्क झाले असून, तिळारीच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्‍यान, तिळारीतून जलविसर्गाचा धोका असला, तरी अजूनतरी जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही.

कोठे, काय घडले?

पणजीतील पाटो, ताळगावातील रस्‍ते पाण्‍याखाली

मडगावातील गांधी मार्केटमध्ये शिरले पाणी

दूधसागर नदीची पातळी वाढली.

फोंडा-दाबाळ मार्गावरील वाहतूक ठप्‍प

देऊळमळ-साकोर्डा पुलावर पाणी

मासोर्डे बांध परिसराला पुराचा धोका

गावकरवाडा-वांते येथे घरावर झाड कोसळून हानी

मळ, शेळीन, मुरमुळे, वेळूस येथेही पडझड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT