Rice Farming Goa X
गोवा

Rice Farming: गोमंतकीयांसाठी चिंतेची बातमी! भातशेती लागवडीच्या क्षेत्रफळात घट; उत्पादन मात्र वाढले

Rice Farming Goa: राज्यातील भातशेती ही एक प्रमुख शेती आहे. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात भातशेतीची लागवड करण्यात येते. फिशकरी-राईस हे गोमंतकीयांचे पारंपरिक जेवण आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील भातशेती ही एक प्रमुख शेती आहे. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात भातशेतीची लागवड करण्यात येते. फिशकरी-राईस हे गोमंतकीयांचे पारंपरिक जेवण आहे. त्यामुळे भातशेती हा येथील कृषी संस्कृतीचा घटक आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यात भातशेती होते. मागील पाच वर्षांतील भातशेती उत्पादनात वाढ झाली आहे; परंतु काही प्रमाणात लागवडीखालील क्षेत्रफळात घट झाली आहे. राज्यात २०१९-२० आर्थिक वर्षात ३४,६९८ हेक्टर क्षेत्रफळ भातशेती लागवडीखाली होते.

तर उत्पादन १,३५,५६१ टन एवढे होते. पंरतु २०२३-२४ आर्थिक वर्षात ३२,४७७ हेक्टर क्षेत्रफळ भातशेती लागवडीखाली होते. तर उत्पादन १४,२०५६ टन एवढे होते. २०१९-२० आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षातील क्षेत्रफळात २२२१ हेक्टर क्षेत्रफळाचा फरक जाणवतो रब्बी आणि खरीप हंगाम मिळून क्षेत्रफळात निश्‍चितपणे घट झाल्याचे समोर येते. याउलट या दोन्ही वर्षांच्या जरी क्षेत्रफळात घट झाली असली तरी ६४९५ टनाने भात लागवडीत वाढ झाली आहे.

पाच वर्षांतील भात लागवड व उत्पादन

२०१९-२० ३४,६९८ १,३५,५६१

२०२०-२१ ३२,६७७ १,३१,००९

२०२१-२२ ३२,३४७ १,३८,०७३

२०२२-२३ ३१,५१९ १,३२,५९४

२०२३-२४ ३२,४७७ १,४२,०५६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT