RG's Let's go home campaign (Goa) Dainik Gomantak
गोवा

RG चे शिवोलीत ‘घर घर चलो अभियान’

राष्ट्रीय पक्षांकडून गोव्याची तसेच स्थानिक जनतेची झालेली कुचंबणा आणि मानहानी रोखण्याची हीच वेळ: RG

Dainik Gomantak

Goa: शिवोली मतदारसंघातील (Siolim Constituency) विविध पंचायत क्षेत्रांत रिव्‍होल्‍युशनरी गोवन्सच्या (RG) तरुणांनी ‘घर घर चलो अभियाना’स (Let's go home campaign) सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) शिवोलीतून ‘आरजी’च्या उमेदवाराची निवड करण्यासाठी करण्यात येत असलेला तो एक प्रचाराचा भाग असल्याचे ‘आरजी’चे गौरेश आगरवाडेकर यांनी दै. ‘गोमन्‍तक’ला सांगितले.

राष्ट्रीय पक्षांकडून गोव्याची तसेच येथील स्थानिक जनतेची झालेली कुचंबणा आणि मानहानी रोखण्याची वेळ आली असून, राज्याला ‘आरजी’शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्याची प्रगती म्हणजे नुसते नदीवरील पूल आणि निसर्गाचा नाश करून उभारण्यात येत असलेले मेगा प्रोजेक्ट नसून, जोपर्यंत येथील स्थानिक नागरिक स्वतःला स्वतःच्या राज्यात सुरक्षित समजत नाहीत, तोपर्यंत अशा विकासाला गोमंतकीय जनता भकास हेच नाव देणार यात शंका नसल्याचे आगरवाडेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT