बाबूला 'लोकलचा' उमेदवारच मडगावला पाठवणार

'भाजपाचे जुने कार्यकर्ते राजन कोरगावकर सोबत असल्याचा' मिशन फॉर लोकलचे माजी सरपंच राजू नर्स यांचा दावा
Mission for Local's PC
Mission for Local's PCDainik Gomantak

Goa: मिशन फॉर लोकलचे (Mission for Local) उमेदवार राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) हे स्थानिकच असून त्याच्या मागे केवळ कोरगाव नव्हे तर पूर्ण पेडणे मतदार संघातील जनता त्यांच्या सोबत आहे शिवाय भाजपाचे जुने कार्यकर्ते राजन सोबत आहे असा दावा मिशन फॉर लोकलचे माजी सरपंच राजू नर्स यांनी पत्रकार परिषदेत केला.

Mission for Local's PC
गोव्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी?;पाहा व्हिडिओ

28 रोजी भाजपा मंडळ पेडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर हे स्थानिक नसल्याचा आरोप केला होता ,त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मिशन फॉर लोकलने पत्रकार परिषद आयोजित केली हाती त्यावेळी राजू नर्स रुपेश मांन्द्रेकर ,लॉरेन्स मेंडोसा ,रुपेश मन्द्रेकर,नरसिव्ह राव भाटलेकर ,वासुदेव गावडे ,राघोबा हरमलकर ,महेश हरमलकर साईनाथ पालयेकर , आदी उपस्थित होते .

राजन कोरगावकर हे जन्माने कोरगावचे आहे तर त्यांची कर्मभूमी मडगाव. त्यामुळे ते लोकल नाही असा आरोप भाजपा मंडळ सचिव सुशांत मांद्रेकार यांनी केला होता त्याला उत्तर देताना मिशन फॉर लोकलचे माजी सरपंच राजू नर्स यांनी बोलताना सुशांत कोरगावकर हे देखील जन्माने कोरगावचे असून ते कामाला पणजीत असल्यामुळे म्हापसा येथे राहतात. मग ते लोकल झाले का, असा सवाल करून त्यांचे बोलते धनी कोण आहे, हे पेडणेवासीयांना माहीत आहे. आता थेट स्थानिक उमेदवारांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीच पत्रकार परिषद घ्यावी दुसऱ्याना बोलण्यासाठी प्रवृत्त करू नये , राजन कोरगावकर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने बाबू आजगावकर यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने बाबू आजगावकर आमच्या नेत्यांना टोप्या घालतात, असा आरोप करतात, मिशन फॉर लोकलचे काम मतदार संघात वर्षभर चालू आहे, आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना आताच कोरगावकर हे टोप्या घालतात, असा कसा साक्षात्कार झाला असा सवाल करून ,बाबूने विनाकारण आरोप करू नये हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन करावे ,बाबू आजगावकर यांच्या कारनाम्याची फाईल आपल्याकडे आहे पुराव्यासहित ते आपण योग्य वेळी सादर करू शकतो ,पुराव्याशिवाय आपण बोलत नाही असे राजू नर्स म्हणाले .

Mission for Local's PC
वास्कोतून विद्यमान आमदार कार्लुस आल्मेदा यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित

तुळसीदास यांना सरपंच का केले नाही?

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी भाजपा मंडळ अध्यक्ष तुलसीदास गावस यांना साडेचार वर्षात सरपंच का केले नाही ,त्यांना पंचच का ठेवले ,ते जिल्हा सदस्य होणार म्हणून जिल्हा तोरसे मतदार संघ महिलांसाठी राखीव ठेवला ,आता ते केवळ त्याचा वापर पक्षाच्या बैठकांना करतात ,हिम्मत असेल तर बाबू ने गावस यांना सरपंच करावे असे आवाहन माजी सरपंच राजू नर्स यांनी दिले .

साडेचार वर्षात कार्यकर्त्यांना पाहिले नाही

बाबू आजगावकर यांनी साडेचार वर्षात भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्या कडे दुर्लक्ष झाले आताच त्यांना पुळका का ज्यावेळी राजन कोरगावकर यांची साठी जेष्ठ भाजपा कार्यकर्त्यांनी दिली त्यावेळीच बाबूंना त्यांची आठवण कशी कांय झाली असा सवाल केला .

सुशांत मन्द्रेकर निष्ठावंत कसे?

सुशांत मन्द्रेकर 2017 च्या निवडणुकीत सुशात हे मगो बरोबर होते व ते प्रचार करताना रडले सुद्धा , मग ते भाजपाचे निष्ठावन कसे शिवाय जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांना भाजपाच्या डावलून सुशांत मंडळाचे सचिव कसे ,तेच पेडणेकर बद्दल फूट घालून दुफळी घालण्याचा प्रयत्न करतात तो थांबवावा असे आवाहन नर्स यांनी केले .

कोरगाव पंचायत जेव्हा राजन कोरगावकर यांच्या व्यासपीठावरील चढली तेव्हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणतात पंचानी सुरा खुपसला ,मग बाबूला मगोचे निवडून दिल्यावर रातोरात ते भाजपात गेले तेव्हा त्यांनी कुणाच्या पाठीत सुरा खुपसला असा प्रश्न केला .आवाज करून जर सरकारी नोक ऱ्या मिळतात तर याहीपुढे आपण आवाज करणार जेणेकरून युवकांना नोकऱ्या मिळतील .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com