कोलवाळ: मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना अडवून अपशब्द वारल्याप्रकरणी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब अडचणीत सापडले आहेत. परब यांच्याविरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परब यांना आज (३० सप्टेंबर) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार त्यांना पोलिस स्थानकात हजेरी लावली.
GST कर प्रणालीत करण्यात आलेल्या कपातीनंतर भाजपकडून सर्वत्र जीएसटी उत्सव साजरा केला जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. मंत्री हळर्णकर हे भाजप कार्यतर्त्यांसोबत पिर्ण – बार्देश येथे जागृती करत होते. यावेळी आरजी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली.
मनोज परब आणि मंत्री हळर्णकर देखील यावेळी आमने – सामने आले होते. मंत्र्यांना अडवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आरजी प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी केला. परब यांनी यावेळी मंत्र्यांना अडवून त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आज परबांना पोलिस स्थानकात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस स्थानकात हजेरी लावली.
मनोज परब नागरिकांची दिशाभूल करुन स्वत:ची राजकीय पोळी नये. कोलवाळमध्ये राम मंदिर किंवा स्थानिकांची घरे पाडली जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण मंत्री हळर्णकरांनी दिले होते.
मनोज परब यांनी पिर्णमधील स्थानिकांना रस्ता रिंदिकरणाच्या नावाखाली नोटीसा अल्याचा दावा केला होता. त्यांची घरे सुरक्षित राहणार की नाही? हे मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.