Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

Goa RG Congress Alliance: काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्‍चित झाल्‍यानंतर महिन्‍याभरापूर्वीच आम्‍ही काँग्रेसकडे 16 जागा मागितल्‍या होत्‍या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीचे निश्‍चित झाले असले, तरी जागावाटपावर अजूनही शिक्‍कामोर्तब होत नसल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर, रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजी) प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पर्वरी येथे बैठक होणार आहे.

जागावाटपात काँग्रेसकडून समाधान न झाल्‍यास पुढे काय निर्णय घ्‍यायचा? याबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार असल्‍याचे ‘आरजी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी शनिवारी (ता.३१) ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

‘‘काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्‍चित झाल्‍यानंतर महिन्‍याभरापूर्वीच आम्‍ही काँग्रेसकडे १६ जागा मागितल्‍या होत्‍या; परंतु काँग्रेसकडून त्‍याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. निवडणुकीसाठी अवघेच महिने शिल्लक राहिल्‍याने जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. त्‍याअनुषंगाने रविवारच्‍या बैठकीत चर्चा केली जाईल. याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जातील आणि त्‍यानुसार पुढील निर्णय घेण्‍यात येईल’’, असे आमदार बोरकर म्‍हणाले.

दरम्यान, अध्‍यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्‍यास घेतलेले मनोज परब पुन्‍हा सक्रिय झाले असून, अजय खोलकर यांच्‍या साथीने त्‍यांनी आमदार बोरकर यांच्‍यावर हल्लाबोल सुरूच ठेवलेला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक जवळ आलेली असतानाही काँग्रेसकडूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जात नसल्‍याने ‘आरजी’च्या पदाधिकाऱ्यांत संभ्रमावस्‍था पसरली आहे. त्‍यातूनच काँग्रेसला जागावाटपाबाबत मुदत देणे आणि त्‍या मुदतीत निर्णय न झाल्‍यास स्‍वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जाण्‍याचा सल्ला काही पदाधिकाऱ्यांकडून आमदार बोरकर यांना दिला जात आहे. त्‍यावर बोरकर काय निर्णय घेणार? हे रविवारच्‍या बैठकीनंतरच स्‍पष्‍ट होणार आहे.

परब-खोलकरांना उघडे पाडण्‍याची तयारी सुरू

निवडणुकीच्‍या तोंडावर ‘आरजी’त फूट पाडण्‍यासाठी भाजपनेच मनोज परब आणि अजय खोलकर यांना मैदानात उतरवले आहे. त्‍यामुळेच परब गटाच्‍या पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्‍या बैठकांना उपस्‍थित राहण्‍याची संधी मिळत असल्‍याचे बोरकर गटाच्‍या पदाधिकाऱ्यांना वाटत असल्‍याने पुढील काळात परब-खोलकर यांना उघडे पाडण्‍याची तयारी त्‍यांनी सुरू केली असल्‍याचे सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhangar ST Status Demand: 23 वर्षांची प्रतीक्षा, आता धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 'एसटी' दर्जा न मिळाल्यास 4-5 आमदारांना पाडण्याचा दावा

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री! गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, दिवाळीपूर्वीच महागाईचा मोठा झटका

खरी कुजबुज: जो जिता वही सिकंदर!

Rohit Sharma: 2027 वर्ल्डकपसाठी 'हिटमॅन'ची खास रणनीती! विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा गाजवणार मैदान

Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT