Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans ची ‘बस्ती हटाव’ मोहीम! बिगर गोमंतकीयांकडून सुरक्षा यंत्रणेलाच धोका

शापूरमध्ये बेकायदा घरे: आमेगोळ, चिंबलमध्ये राजकारण्यांकडून अभय

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans गोवा आणि गोमंतकीयांचे अस्तित्व नष्ट करू पाहणाऱ्या बिगर गोमंतकीय झोपडपट्टीवासीयांची त्वरित हकालपट्टी करण्यासाठी आता िरव्हाॅल्युशनरी गोवन्सने पुढाकार घेतला असून यासंबंधीची ‘बस्ती हटाव’ मोहीम सरकारने त्वरित सुरु करावी, अशी मागणी आरजीच्या फोंड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत आरजीचे प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक, शैलेश नाईक तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. गोवा विधानसभेत यासंबंधीचा ठराव आरजीचे आमदार वीरेश बोरकर मांडणार असल्याने सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले.

फोंड्यातील शापूर - बांदोडा तसेच बेतोडा येथील दत्तगड आदी ठिकाणची बस्ती वाढली असून या बस्तीवाल्यांना राजकारण्यांकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

आमेगोळ, चिंबल, इंदिरानगर व इतर ठिकाणच्या झोपडपट्टीवासीयांना राजकारण्यांकडून अभय मिळत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा बस्तीत आश्रय घेत आहेत.

राज्यात गोव्याबाहेरून आलेल्या लोकांकडूनच गुन्हे होत असून नव्वद टक्के गुन्हे हे याच लोकांकडून झाले असल्याची टिप्पणी खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली असल्याने अशा बस्ती आता हटवण्याची आवश्‍यकता असल्याचे आरजीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

सुरक्षा यंत्रणेला धोका

शापूर - बांदोडा येथील बस्ती बेकायदेशीररीत्या वसली असून लष्कराच्या तळाजवळ तसेच वसलेल्या या लोकांत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असण्याची शक्यता असून त्यामुळे सुरक्षा यंत्रणेलाच धोका निर्माण झाल्याचे ‘आरजी’वाले म्हणाले.

या लोकांमुळे लगतच्या स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याने सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती, त्यासंबंधीचे एक निवेदन बांदोडा ग्रामपंचायत तसेच इतर सर्व सरकारी खात्यांना, आमदारांना देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT