Mapusa Market : म्हापसा मार्केटमधील आपत्कालीन सेवेचे वास्तव समोर, मार्केट मधील रस्ते अरूंद करण्याची मागणी

बेपर्वाईपणा : आपत्कालीन सेवेची वाहने जाऊ शकतील इतकीही जागा नाही; अतिक्रमण वाढले
Mapusa Market
Mapusa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Market : उत्तर गोव्यातील म्हापसा ही प्रमुख बाजारपेठ असल्याने ती नेहमीच गजबजलेली असते. या बाजारपेठेला पोर्तुगीजकालीन वारसा असून सध्या येथील विक्रेत्यांच्या संख्येत अमर्यादित वाढ होत असल्याने या बाजारपेठेत पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा नसते.

विशेष म्हणजे, आग प्रतिबंधक वाहने किंवा रुग्णवाहिका जाऊ शकेल इतपत जागाही नाही, असे भीषण चित्र सद्यस्थितीत आहे. त्यामुळे भविष्यात या बेपर्वाईमुळे बाजारपेठेत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंगळवारी (ता.२६) म्हापसा मार्केटमधील अंतर्गत रस्त्यावर एका वयस्कर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेला बोलावले गेले.

परंतु रुग्णवाहिकेला मार्केटमध्ये जाण्यास पुरेशी जागा नसल्याने या रुग्ण महिलेस शेवटी कर्मचाऱ्यांना स्ट्रेचरवरून बाहेर आणण्याची वेळ ओढवली.

यातूनच म्हापसा मार्केटमधील आपत्कालीन स्थितीचे गंभीर वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे म्हापसा पालिका व संबंधितांनी आपत्कालीन सेवेसाठी पुरेशी वाट किंवा जागा ठेवावी, अशी मागणी होत आहे.

Mapusa Market
Goa Assembly : अमली पदार्थ, वेश्याव्यवसायनंतर आता गोवा जुगारासाठी प्रसिद्ध - डिकॉस्टा | Yuri Alemao

अन्यथा मार्केटमध्ये भीषण घटना घडू शकते. त्यामुळे वेळीच पालिकेने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

मुळात पोर्तुगीजकालीन या ‘ड्राईव्ह ईन’सारखी संकल्पना असलेल्या म्हापसा बाजारपेठेतील रस्ते, पदपथ अडवून चाललेल्या या कारभारामुळे एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास त्या व्यक्तीला इमर्जन्सी सेवा मिळणे कठीण बनल्याचे दिसते.

मंगळवारची घटना याचे एक ज्वलंत उदाहरण ठरली. त्यामुळे उद्या सकाळी या मार्केटमध्ये अशी एखादी आपत्कालीन किंवा आगीची दुर्घटना घडल्यास इमर्जन्सी सेवा आतमध्ये प्रवेश करणार कशी? हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

Mapusa Market
Goa Assembly Monsoon Session : केक, वीड ब्राऊनीमधून ड्रग्जविक्री ; पेस्ट्री दुकानांची तपासणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गैरव्यवस्थापनाला पालिका जबाबदार

मार्केटमधील स्टॉल्सच्या विभाजनासाठी व छतासाठी मोठ्या प्रमाणात ताडपत्रीचा वापर केला आहे. त्यामुळे आग लागल्यास ती वणव्यासारखी पसरण्याची शक्यता आहे.

मार्केटमध्ये चारचाकी वाहनांचे मार्केट आवारात पार्किंग केले जाते. त्यामुळे आपत्कालीन सेवा सोडा, लोकांना चालण्याची साधी सोय नसते.

मार्केटमधील या बजबजपुरीला तसेच गैरव्यवस्थापनाला स्थानिक पालिका व येथील

लोकप्रतिनिधी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

म्हापसा पालिका मार्केटचे अंतर्गत रस्ते विक्रेत्यांच्या अमर्यादित गर्दी व पालिकेच्या गैरव्यवस्थापनामुळे आपत्कालीन सेवांसाठी दुर्गम बनले आहेत. दुर्दैवाने मागील पंधरा वर्षांपासून म्हापसा शहरामध्ये सत्ताधारी भाजपने दुकानदार, विक्रेते किंवा ग्राहकांना कोणतीही सुविधा दिलेली नाही. याशिवाय मार्केटमधील शौचालयांची स्थिती गंभीर आहे.

अ‍ॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com