Goa Revolution Day 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day 2025: शौर्य, त्याग आणि अभिमानाचा दिवस! गोवा क्रांती दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Goa Revolution Day 2025 Wishes In Marathi: गोव्यात दरवर्षी 18 जून हा दिवस मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Manish Jadhav

Goa Revolution Day 2025 Wishes In Marathi

18 जून 1946 ही तारीख गोव्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या एका अविस्मरणीय दिवसाची आठवण करुन देते. याच दिवशी महान समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी क्रूर पोर्तुगीज सालाझारच्या वसाहतवादी राजवटीविरुद्ध गोमंतकीय जनतेमध्ये संघर्षाची भावना जागृत केली होती. गोव्यात दरवर्षी 18 जून हा दिवस मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

महान डॉ. राम मनोहर लोहिया

गोवा मुक्ती संग्रामातील डॉ. लोहिया यांच्या भूमिकेमुळे गोवा मुक्ती संग्राम संपूर्ण भारताचा लढा बनला. गोवा मुक्तिसंग्रामात देशाच्या विविध भागातून विविध लोक सामील झाले. डॉ. लोहिया यांनी वाराणसी येथून गोवा (Goa) मुक्ती संग्रामाचे आंदोलन देशव्यापी करण्याची हाक देत 'चलो गोवा'चा नारा दिला होता. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीला कंटाळेल्या गोमंतकीयांनी निकराचा लढा दिला. या लढ्याचीच आठवण म्हणून 18 जून हा दिवस 'गोवा क्रांती दिन' म्हणून साजरा केला जातो.

गोवा क्रांती दिन हा गोमंतकीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.

गोवा क्रांती दिन शुभेच्छा संदेश (Goa Revolution Day 2025 Wishes In Marathi)

  • गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन… गोवा क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • गोवा क्रांती दिन म्हणजे शौर्य, त्याग आणि अभिमानाचा दिवस! सर्व गोमंतकीयांना शुभेच्छा!

  • गोवा स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या वीरांना सलाम… जय गोवा!

  • गोवा क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे खरे अर्थ समजून घेऊया…

  • गोव्याची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपणाऱ्या सर्वांना गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा!

  • "एक गोवा, एक अभिमान" – या क्रांती दिनी आपल्या गोव्याचा अभिमान वाटू द्या!

  • हुतात्म्यांच्या बलिदानातून फुललेला गोवा… जय गोवा, जय भारत!

  • गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा! चला, आपणही गोव्याच्या विकासासाठी योगदान देऊया.

  • इतिहास लिहिला ज्यांनी, तो दिवस आज आपण साजरा करतो… गोवा क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • गोव्याच्या मातीसाठी लढलेले शूरवीर… त्यांची स्मृती अजरामर राहो!

  • क्रांती हीच प्रगतीची सुरुवात असते… गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा!

  • गोवा म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि स्वातंत्र्याचा संगम! या भूमीला सलाम!

  • गोवा क्रांती दिन - आपल्या इतिहासातील तेजस्वी पर्व… अभिमानाने साजरा करूया!

  • आपला गोवा – आपल्या हक्काचा गोवा! क्रांती दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

  • गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांचे स्मरण हेच खरे देशप्रेम!

  • गोवा क्रांती दिन साजरा करताना, नव्या पिढीला इतिहासाची ओळख करुन देऊया.

  • गोव्याची क्रांती म्हणजे आत्मसम्मानाची लढाई… जय गोवा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील गुहेत दिला बाळाला जन्म, गोकर्णच्या जंगलात केले वास्तव्य; पती आहे उद्योगपती; ‘त्या’ रशियन महिलेबाबत नवीन खुलासा

ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत जो रुट पुन्हा नंबर वन; ब्रूकची घसरण, भारतीय फलंदाजांनाही फटका!

Goan Youth: गोव्यातील तरुणांनी राज्याबाहेर, देशाबाहेर जाऊन स्वतःला सिद्ध केले आहे; मग ते आपल्याच मातीत 'अपात्र' कसे काय?

Haircut in Shravan: श्रावण पाळणार आहात? केस-दाढी कापायची नाही; मग केसांची काळजी कशी घ्याल?

Goa Opinion: सभापतींनी पक्षीय बैठकीत सहभागी व्हावे का?

SCROLL FOR NEXT