Kala Academy  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy : येत्‍या पंधरा दिवसांत कला अकादमी पूर्ववत करा व श्‍वेतपत्रिका काढा; कलाकारांची मागणी

Kala Academy : बैठकीत महत्त्‍वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy :

पणजी, पुढील पंधरा दिवसांत कला अकादमी पूर्ववत न झाल्यास श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी करणाऱ्या ठरावासह इतर आठ ठराव कलाकारांच्या आजच्या बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आले.

दरम्यान, छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाला कलाकार तसेच कला अकादमीप्रेमी येतील का? असा प्रश्‍न आयोजकांना पडला होता. मात्र सभागृह भरून बाहेर तीस-चाळीसजण उभे होते. त्यामुळे आयोजकांना कला अकादमीवर प्रेम करणाऱ्यांची संख्‍या कमी नसल्याचा विश्‍वास पटला. कला अकादमीच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या कथित घोटाळ्याचे पडसाद या ‘कला जागोर''च्या बैठकीत उमटले. बैठकीस उपस्थित मान्यवरांपैकी नाट्यकलाकार देविदास आमोणकर यांनी ठरावांचे वाचन केले.

संभाजीची भूमिका करता, मग राजीनामा द्याच

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. हा पैसा करदात्यांच्या खिशातील आहे. मंत्री गोविंद गावडे हे कलाकार आहेत आणि ते संभाजी महारांजांची भूमिका नाटकांतून सादर करतात. त्या संभाजी महाराजांची शपथ घेऊन गावडे यांनी राजीनामा द्यावा, असे सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी सांगितले.

बैठकीत मांडलेले ठराव

कला अकादमीच्या नूतनीकरण कामाची तपशीलवार व तारीखनिहाय श्‍वेतपत्रिका सरकारने काढावी.

कलाकारांसमवेत कला-संस्‍कृतीमंत्र्यांची बैठक व्हावी.

मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांसमवेतही कलाकारांची बैठक व्हावी.

तालुकानिहाय कलाकारांनी कला अकादमीला भेट द्यावी आणि त्या भेटीची तारीख निश्‍चित करावी.

राज्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या कला अकादमीचे वैभव सांभाळून ठेवण्यासाठी वैयक्तिक किंवा संस्थेच्या माध्यमातून कायदेशीर लढा देणाऱ्यास पाठिंबा देणे.

विविध समाजमाध्यांवरील व्यासपीठावर अकाऊंट खुले करावे, त्याचा चांगल्या व सकारात्मक संवादासाठी वापर करणे.

कला अकादमीच्या स्थितीबद्दल सर्व कलाकार समुदायाने आपले मत व्यक्त करावे आणि संवादाच्या विविध माध्यमांतून आवाज उठवावा, जेणेकरून तो आवाज सरकारपर्यंत पोहोचेल.

कलाकार समुदायांच्या राज्यस्तरीय संघटना तसेच तालुकास्तरीय शाखांनी कला व संस्कृती जोपासण्यासाठी शॅडो कौन्सिल म्हणून काम करावे. त्याचबरोबर कला व संस्कृतीसंबंधी विषयांवर वेळोवेळी आवाज उठवावा.

प्रस्तावित राज्यस्तरीय सांस्कृतिक संघटनेच्या स्थापनेसाठी संयोजकांसह तात्पुरती समिती नेमावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT